Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraAssemblyNewsUpdate : मुख्यमंत्र्यांनी भाजपला अक्षरशः धुतले !!

Spread the love

औरंगाबादचे आम्ही संभाजीनगर करणारच !!

मुंबई । दोन दिवस शांतपणे विरोधकांचा गोंधळ शांतपणे बघत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी करीत अक्षरशः गाजवला. औरंगाबादच्या नामांतराच्या प्रश्नावरून तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच झोडपले आपला ठाकरी बाणा दाखवताना ते म्हणाले कि ,  आम्हाला तुमच्याकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही, असे सांगत औरंगाबादचे आम्ही संभाजीनगर करणारच !!


औरंगाबाद विमानतळाचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय झाला पण तो केंद्राने अडवून ठेवला आहे, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. केवळ भारत माता की जय म्हटलं म्हणजे देशप्रेम सिद्ध होत नाही, असे नमूद करताना संघमुक्त भारताची हाक देणाऱ्या नितीश कुमार यांना तुम्ही आज डोक्यावर घेतले आहे. हे तुमचे हिंदुत्व आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. ‘मेरे वतन के लोगो कविता ऐकवलीत… मी म्हणेन, ए महाराष्ट्र के लोगो, पोछ लो आँख का पानी, जो झूट बोले उनकी खतम करो बेईमानी’, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी हाणला. भाषणामध्ये यमक नाही तर काम करण्याची धमक पण लागते. ती आमच्यात आहे, असे खडेबोल मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर कधी करणार अशी विचारणार भाजप  करत आहे. पण ज्यांनी सरदार वल्लभभाई पटेल  स्टेडियमचे नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव दिले आहे, त्यांनी आम्हाला विचारू नये, असा सणसणीत टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना लगावला.

अमित शहा यांचाही घेतला समाचार

भाजपने विविध मुद्द्यांवर सरकारवर गंभीर आरोप केले. या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषा वापरली. मात्र याच भाषणावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीची माहिती देताना आक्षेपार्ह शब्द वापरला आणि भाजप नेते चांगलेच भडकले. ‘तुम्हाला बाळासाहेबांच्या आठवणीने उमाळे येत आहेत. मात्र याच बाळासाहेबांच्या खोलीत ज्या खोलीला आम्ही मंदिर समजतो, तिथं बंद दरवाजाआड मी आणि अमित शहा यांनी पुढच्या वाटचालीची चर्चा केली, मात्र नंतर निर्लज्जपणे…होय हा शब्द असंसदीय असला तरीही मी वापरतोय…निर्लज्जपणाने आता ठरलेली गोष्ट तुम्ही बाहेर आल्यावर नाकारली, हे तुमचं हिंदुत्व आहे का,’ असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर हल्ला चढवला.

आम्ही थाळी भरून दिली, वाजवायला नाही’

‘पाच रुपयांमध्ये थाळी देण्यात आली. मी राष्ट्रपतींचं भाषण पाहिलं. कोरोनाच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत  8 महिन्यात 80 कोटी लोकांना 5 किलो अन्नधान्य मोफत देण्यात आले आहे. मग आठ महिन्यानंतर अचानक ते श्रीमंत झाले आहे का, त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडरचे दर वाढवले आहे’, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. आम्ही 5 रुपयांमध्ये शिवभोजनाची थाळी देत आहोत. आम्ही भरलेली थाळी दिली फक्त वाजवण्यासाठी थाळी दिली नाही. गरिबांना विचारा भरलेली थाळी पाहिजे की वाजवायला थाळी पाहिजे, असा थेट सवाल भाजप नेत्यांना विचारला.

नारायण भंडारी आणि देवेंद्र फडणवीस !!

देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले , कोरोनामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. पण त्यांना उत्तर देण्याआधी मला लहानपणी नारायण भंडारी याची कथा आठवली. ‘नारायण भंडारी हा गाव सोडून गेलेला असतो तो परत गावात येतो आणि सरांना भेटतो. ओळखला का सर मला, सर म्हणाले तुला कोण नाही ओळखणार. काय बोलतो गांजापासून ते मांजापर्यंत बोलतो. न्यूयार्कपासून ते गावापर्यंत बोलतो. मला आता नवीन गुरू भेटला आहे तिथे जोरात बोलावे लागते. आता मी सरकारच्या कोविड काळातील भ्रष्टाचारावर टीका करून आलोय. आता मला परत पत्रकार परिषद आहे. मगाशी हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार बाहेर काढला होता. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आता पत्रकार परिषद घेऊन त्यांचे समर्थन करण्यासाठी चाललो आहे. असे हे नारायण भंडारी’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेद्र फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांची दिलगिरी !!

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर सत्ताधारी आमदारांमध्ये एकच हश्श्या पिकली पण भाजपच्या गोटातील आमदारांमध्ये खळबळ उडाली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘काय तो मुख्यमंत्री’, असं एका आमदाराने म्हटलं आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. या सगळ्या प्रकारानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारत या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!