Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : महिला न्यायाधीशांना “हॅपी बर्थ डे ” मॅसेज देणारा वकील पोहोचला थेट तुरुंगात…

Spread the love

रतलाम | मध्य प्रदेशातील एका प्रथम वर्ग महिला न्यायाधीशांना एका ३७ वर्षीय वकिलाने मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खऱ्या पण वकिलीत पहिलेच पाऊल टाकलेल्या या वकिलाला हि गुस्ताखी इतकी महागात पडली कि , या वकील महाशयांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे .  वकिलाने पाठवलेला वाढदिवसाचा “मेसेज” न्यायाधीशांना ‘आक्षेपार्ह’ वाटल्याने त्यांनी या वकिलावर आयटी कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणात संबंधित वकिलाने  न्यायदंडाधिकारी प्रथम न्यायालयालापासून सत्र न्यायालयापर्यंत जामीनासाठी अर्ज केला. पण त्याला कुठेही दिलासा मिळाला नाही. जामीनाचे  हे प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचले आहे.

त्याचे असे झाले कि , रतलाम जिल्हा न्यायालयातील एका  महिला न्यायाधीशांचा २८ जानेवारीला वाढदिवस होता. वकील विजयला हे समजताच त्याने त्याच रात्री एक वाजून अकरा  मिनिटांनी न्यायाधीशांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या. इतके करूनच हे वकील महाशय थांबले नाही तर त्यांनी स्पीड पोस्ट नेही हे ग्रेटींग रवाना केले . या वकिलाने न्यायाधीशांच्या फेसबुक अकाऊंटवरुन त्यांचा फोटो डाऊनलोड करून  तो ग्रीटिंग कार्डच्या स्वरुपात पाठवला होता. वकील विजयने पाठवलेल्या अशाप्रकारच्या शुभेच्छा न्यायाधीशांना न आवडल्याने त्यांनी त्या वकिलाची तक्रार थेट रतलाम पोलीस स्टेशनमध्ये केली.

या तक्रारीनंतर रतलाम पोलिसांनी वकील विजयविरोधात आयपीसीच्या कलम 420, 467, 468, 469 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 आणि 41 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला 9 फेब्रुवारी रोजी अटक केली. तेव्हापासून तो जेलमध्येच आहे. दरम्यान जिल्हा न्यायालयात जामीन न मिळाल्याने त्याने सत्र न्यायालयात अर्ज केला होता, मात्र तिथेही त्याला दिलासा मिळाला नाही. आता त्याने उच्चन्यायालयाच्या  इंदौर  खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान सामाजिक कार्यकर्ता आणि जय कुल देवी सेवा समिती, रतलामचा अध्यक्ष म्हणून मी हा शुभेच्छा संदेश पाठवला होता. तसेच न्यायाधीशांचा फोटो त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन नाही तर गूगलवरुन डाऊनलोड करुन घेतला होता. त्याचा वापर क्रिएटिव्ह डिझायनर म्हणून केला, असा दावा त्याने आपल्या जामीन अर्जात केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!