Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : टिक टॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात घडल्या या दोन महत्वपूर्ण घटना…

Spread the love

बीड । बहुचर्चित टिक टॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात होणारी बदनामी लक्षात घेऊन एकीकडे पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी परळी पोलीस ठाण्यात पूजेची चुलत आजी म्हणविणाऱ्या शांताबाई राठोड यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. शांताबाई राठोड यांनी आमच्या कुटुंबीयांवर केलेले आरोप निराधार असून आमची बदनामी करणारे आहेत, त्यामुळे शांताबाई राठोड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा अशी तक्रार त्यांनी  परळी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे, त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणाला नवे  वळण लागले  आहे तर दुसरीकडे पूजाच्या मृत्यू प्रकरणाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे वृत्त आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची विनंती करणारी हि फौजदारी याचिका समाजिक कार्यकर्ता हेमंत पाटील यांनी केली असून पुणे पोलिसांच्या तपासावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही याचिका येत्या काही दिवसांत सुनावणीला येण्याची शक्यता आहे.

हेमंत पाटील यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे कि , पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचा तपास होणे आवश्यक आहे. या मृत्यूमागे माजी वनमंत्री संजय राठोड आणि अरुण राठोड नावाची व्यक्ती गुंतली असल्याचे दिसत आहे. मात्र, राजकीय दबावामुळे पुण्यातील वानवडी पोलीस निष्पक्ष तपास करताना दिसत नाहीत. त्यामुळे पोलिसांना या दोघांविरोधात एफआयआर नोंदवून तपास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेत या दोघांसह राज्याचे पोलीस महासंचालक, पुणे पोलीस आयुक्त आणि वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

पूजाचे वडील पोलीस ठाण्यात

दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्येनंतर पूजेची आणि आमच्या कुटुंबीयांची बदनामी थांबवावी अशी मागणी करण्यासाठी रविवारी पूजाचे आईवडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना संशयावरून संजय राठोड यांचा बळी देऊ नका असे  म्हटले होते, नेमके  यावरूनच पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दुसऱ्याच दिवशी पूजाच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले होते. या आरोपात पूजाच्या आई वडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये दिल्याचा दावा केला होता, आता या प्रकरणात लहू चव्हाण यांनी परळी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

पूजा चव्हाणचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर

पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाच्या अहवालात तिच्या मणक्यािला आणि डोक्याचला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यू झाल्याचे कारण समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर मात्र पोलिसांकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे, त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच याविषयीची अधिक माहिती दिली जाईल असे या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

बीड। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. या प्रकरणात गंभीर आरोपामुळे शिवसेना नेते संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरही हे प्रकरण शांत होण्याचं नाव घेत नसून आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरू आहेत. अशातच चुलत आजी असल्याचा दावा करत एका महिलेने पूजाच्या वडिलांविरोधातच गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्याविरोधात परळी शहर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली. हे प्रकरण मिटवण्यासाठी मी 5 कोटी रुपये घेतल्याचा खोटा आरोप शांताबाई राठोड यांनी केला होता. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात बदनामी केल्याप्रकरणी तक्रार दाखल करत असल्याची भूमिका लहू चव्हाण यांनी घेतली आहे.

शांताबाई राठोड यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

‘5 कोटी रुपये दिलेले आहेत म्हणून तिच्या आई वडिलांचे तोंड बंद आहे. पूजाचे आणि माझे चांगले रिलेशन होते. अरुण राठोड हा माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे. पुजाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न म्हणून तृप्ती देसाई यांची मदत घेतली. पूजाच्या आई वडिलांना संजय राठोडवर गुन्हा दाखल होऊ द्यायचा नाही. पोलिसांना सगळं माहिती असताना गुन्हा दाखल होत नाही. जर गुन्हा दाखल झाला नाहीतर मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार,’ असं म्हणत शांताबाई राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!