Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा : 22 आरोपी निष्पन्न, 12 आरोपींना बेड्या

Spread the love

नागपूर | बनावट क्रिडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नागपूर पोलिसांनी आता पर्यंत २२आरोपी निष्पन्न केले असून त्यापैकी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेचए एकूण  ८ आरोपीच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दोषरोपपत्र वेळेमध्ये (90 दिवसाचे आत ) दाखल केले आहे.

दरम्यान याप्रकरणी अजून तपास चालू असून फरार चार आरोपी विरोधात न्यायालयायाकडून अटक वॉरंट पोलिसांनी मिळवले असल्याची माहिती  पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली आहे.
आजपावेतो तपासात निष्पन्न झालेले
-.आरोपी -22
अटक आरोपी- एकूण-12 —-(सांगली-2,परभणी-२,नांदेड-१ , औरंगाब-१,बीड-१ ,अहमदनगर-2 ,नागपूर-२,ठाणे -1
तीन आरोपी चे जामीन प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. तर नागपूर पोलिस वेळोवेळी प्रत्येक तारखेस स्वतः हजर राहून विरोध करत आहे
तीन आरोपींचे जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जमीन फेटाळले आहेत
फरार आरोपींच्या अटकेसाठी नागपूर पोलिसांची पथके बीड ,औरंगाबाद,पुणे, सोलापूर व मुंबई या ठिकाणी पोलिसआयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाने पाठवण्यात आली आहेत.
अन्य एका गुन्ह्यामध्ये तपासात नवीन निष्पन्न झालेला आरोपी हा महाराष्ट्र आईस हॉकी चा सचिव प्रशांत चव्हाण पोलिस कॉन्स्टेबल नेमणूक पोलीस मुख्यालय ठाणे शहर यास ताब्यात घेतले व नमूद गुन्ह्यात सबळ पुरावे मिळून आल्याने त्यास दि 27/2/21 रोजी 21-00 वाजता अटक करून आज रोजी नागपूर मा न्यायालयात हजर केले असता त्यास 9/3/21 पर्यंत pcr मजूर केला आहे नमूद आरोपीने नागपूर विभागात एकूण तीन मुलंना बनावट आईस हॉकी चे राष्ट्रीय प्रमाणपत्र दिले असून महाराष्ट्रात एकूण -108 प्रमाणपत्र क्रीडा कार्यालयातील पडताळणी करून घेतले आहे यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रथमदर्शनी दिसून आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेे.

या सर्व प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेशकुमार , अप्पर पो आयुक्त  नाविनचंद्र रेड्डी ,  Dcp विनिता साहू , Acp नंदणवार , वपोनी श्रीमती मंडवधारे याचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शिंदे कृष्णा खाली तपास करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!