Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Covid-19 vaccination : मोदी , शहा यांच्यासह अनेक जेष्ठ नेत्यांनी घेतली कोरोनाची लस

Spread the love

नवी दिल्ली :  कोरोना लसीकरण मोहीमेच्या  दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह  बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदी ज्येष्ठ नेत्यांनी लसचा पहिला डोस घेतला आहे.

सरकारी आणि खासगी केंद्रांवर ही लस दिली जाईल. यासाठी 10,000 सरकारी आणि 20,000 खासगी केंद्रे आहेत. सरकारी केंद्रांवर मोफत तर खासगी केंद्रावर शुल्क घेऊन लस दिली जाईल. कोरोनावरील लस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर दुपारी एक वाजेपर्यंत १० लाखांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  दिली.  दरम्यान, देशातील ८ राज्यांमध्ये करोनाचे नवीन रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. केरळ, महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर आणि मध्य प्रदेशात गेल्या दोन आठवड्यांपासून दररोज नवीन रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन COVAXIN  हि लस टोचून घेतली आहे. त्यांनी  लस घेतली आहे. एम्स हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या आणि पुद्देचरी येथील राहणाऱ्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदी यांना कोरोनाची लस दिली . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घ्यावी अशी आग्रहाची मागणी विरोधकांकडून होत होती. अखेर लस घेण्याआधी कुठलाही गाजावाजा न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली आहे.

लस घेतल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे ,कि  ‘आपले डॉक्टर आणि शास्त्रांनी कोरोनाच्या विरोधातील लढाईत कमी वेळेत महत्त्वाचे काम केले आहे. जी लोकं कोरोना लस घेण्यासाठी योग्य आहे, त्यांनी लस टोचून घ्यावी, आपल्या सर्वांना भारत कोरोनामुक्त करायचा आहे. मोदींनी लस घेतल्याचे वृत्त येताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये करोनावरील लस घेतली.

देशात सुरु झालेल्या लसीकरणाच्या  तिसऱ्या टप्प्यात 60 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. सोबतच 45 वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचेही या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ज्या रुग्णालयांमध्ये जन आरोग्य योजना तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजना राबवल्या जातात तिथे हे लसीकरण देण्यात येणार आहे. तसंच शासनाच्या निर्धारित रुग्णालयात लसीकरण विनामूल्य आहे, तर खाजगी रुग्णालयात मात्र लसीकरणाच्या प्रत्येक डोससाठी 250 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!