Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : पूजा चव्हाण आत्महत्या आणि  वन मंत्री संजय राठोड राजीनामा प्रकरणावर मुख्यमंत्री आक्रमक , विरोधकांना दिली उत्तरे

Spread the love

मुंबई । उद्यापासून १० दिवस सुरु होत असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमकपणे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देत सरकारची भूमिका मांडली. यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या आणि  वन मंत्री संजय राठोड राजीनामा प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी जे व्हायचे ते कायद्याने होईल. आततायीपणाने काहीही होणार नाही. कोणी कितीही मोठा असला तरी चौकशीत , नि:पक्ष तपासात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणारच हे सांगताना असे ठामपणे सांगताना खा. डेलकर यांच्या आत्महत्येवरून भाजपवर पलटवार केला.


प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि , सरकार चालवतांना आमची जबाबदारी असते न्यायाने वागणे, पण मागील काही महिन्यात एकूण  गलिच्छ राजकारण सुरू झालं आहे. तपास हा झालाच पाहिजे. पण हा तपास नि:पक्षातीपणाने केला गेला पाहिजे. जर कुणी त्याच्यात गुन्हेगार असेल, जर कुणी दोषी असेल. तर तो कोणी कितीही मोठा असला, तर त्यावर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे. अशी या सरकारची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे. आज संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, केवळ राजीनामा घेणं. हातात काही पुरावे असोत नसो गुन्हा दाखल करून मोकळं होणं म्हणजे कुणाला न्याय देणं असं होत नाही. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

तसेच, तपास यंत्रणेवर व तपासावरती कोणाला एखाद्याला सोडवायचं म्हणूनही दडपण असता कामा नये, पण त्याच बरोबरीने एखाद्याला लटकवायचंच आहे. त्याला आयुष्यातून उठवायचंच आहे, असाही तपास असता कामा नये, असंही दडपण असता कामा नये. हे मुद्दाम सांगतो आहे कारण मागील वर्षभरापासून, अशा काही घटना अशा काही गोष्टी घडत आहेत, की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा. तपासाला तुम्ही दिशा देऊ शकणार नाही. हा नि:पक्षपातीपणाने सुरू आहे. असं देखील मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

कुणालाही पाठिशी घालणार नाही

ज्या क्षणी ही घटना आम्हाला कळाली त्याच क्षणी आम्ही या घटनेची नि:पक्षपातीपणाने चौकशी व तपासाचे आदेश दिले आहेत. पोलिसांना लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यातून जे काही सत्य बाहेर येईल ते सत्य कुणालाही पाठिशी घालणार नाही. जो कुणी त्यात आरोपी असेल, त्याला क्षमा होणार नाही. पण हे सगळं करत असताना नुसती आदळआपट करून, तपासाची दिशा भरकटून टाकायची. हा जो काही प्रकार आणि प्रघात घातला जातो आहे, हा फार गंभीर आहे. अगोदर चौकशी नीट होऊ द्या. तपास नीट होऊ द्या. ही तपास यंत्रणा तीच आहे ज्यांच्यावर तुमचा अविश्वास आहे. तुमच्या काळात देखील हीच तपासयंत्रणा होती. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नुसते आरोप करणे म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात

‘आमची जबाबदारी न्यायाने वागणे ही असते. तपास हा झालाच पाहिजे आणि कोणी दोषी असेल तर शिक्षाही झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. मात्र कोणाला मुद्द्याम अडकवता कामा नये. पोलिसांना नि:पक्ष चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या काळातही हीच पोलीस यंत्रणा होती. मात्र आता ते पोलिसांवरच अविश्वास दाखवत आहेत,’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली आहे. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असे म्हटले जात आहे. मात्र, तसे होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिला आहे असे ही उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की तुम्ही सोबत असाल तर प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. नुसते आरोप करणे म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात, असेच आहे. ज्या वेळेस घटना घडली त्याच वेळेस तपासाच्या सुचना दिल्यात. कालबाह्या तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश, कुणालाही पाठिशी घालणार नाही. नुसती आदळआपट करण्याचा प्रघात योग्य नाही. तुमच्या काळातही हिच तपास यंत्रणा असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली.

राज ठाकरे यांना केला नमस्कार !!

कोरोना काळात भ्रष्टाचाराच्या आरोपाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले आरोप खोटा आहे. धारावी पॅटर्नचे जागतिक पातळीवर कौतुक झाले आहे. सरकारचे सोडा पण तुम्ही कोविड यौद्ध्यांची थट्टा करताय. असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्राने कधी अनुभवला नाही. इतरही काही आरोप केलेत त्या सर्वाची उत्तर सध्या देणार नाही. सावरकरांची जयंती की पुण्यतिथी हे आधी त्यांनी ठरवावं. कर्नाटकात तुम्ही आहात, खाली वर तुम्ही आहात सीमाप्रश्न का सोडवला नाही, असाही सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी मास्क घालणार नाहीत याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे ? असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले ” मी नमस्कार करतो त्यांना…मी आधीच सांगितले आहे. मास्क शिवाय पर्याय नाही.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!