Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservation : मराठा आरक्षणासाठी सरकारचे पूर्ण प्रयत्न : मुख्यमंत्री

Spread the love

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून  विरोधकांनी  केलेल्या टीकेला  उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले कि ,  मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. विरोधकांनी पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार .

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी  मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. राज्यतील सत्ताधारी नेत्यांमध्येही इच्छाशक्ती दिसून येत नाही, अशी टीका केली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारची भूमिका मांडली.

केंद्राने सकारात्मक भूमिका घ्यावी : अशोक चव्हाण

या बाबत बोलताना उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले यांच्या उपस्थितीत बैठक मराठा आरक्षणावरील उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत सर्वांगिन चर्चा झाली, आहे. सुप्रीम कोर्टाने अॅटर्नी जनरलना नोटीस बजावली आहे. तसेच इसीबीसी प्रकरणही सुप्रीम कोर्टात गेले आहे. यामुळे या मुद्द्यावर केंद्र सरकारने सहकार्याची भूमिका घ्यावी. ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर हा प्रश्न सुरू सुटणार नाही. त्यासाठी ९ किवा ११ न्याधीशांचं घटनापीठ असावं. तसंच ही सुनावणी प्रत्यक्ष घ्यावी. विरोधी पक्षांची भूमिकाही सकारात्मक आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून कोर्टात एक भूमिका मांडल्यास त्याला वजन मिळेल.

मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका करताना भाजपचे खा. उदयनराजे म्हणाले , राज्यातील आधीच्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी गायकवाड आयोग नेमला. गायकवाड आयोगाने दिलेल्या अहवालात राज्यातील ७० टक्के मराठा समाज मागास असल्याचे म्हटले तर दुसरीकडे सरकार ईसीबीसी सवलीत लागू करीत आहे.  हा कोर्टाचा अवमान आहे. मराठा समाजाच्या विकासाठी स्थापन केलेल्या सारथी सारख्या संस्था अखेरच्या घटका मोजत असल्याची टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!