Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : अशी आहे राज्याची परिस्थिती , नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ

Spread the love

गेल्या २४ तासात राज्यभरात ८ हजार २९३ नवे करोनाबाधित वाढले असून, ६२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याचबरोबर ३ हजार ७५३ जण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यातील एकूण बाधितांची संख्या आता २१ लाख ५५ हजार ७० वर पोहचली आहे. राज्यातील मृत्यू दर २.४२ टक्के आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट) ९३.९५ टक्के आहे.

राज्यात आतापर्यंत २० लाख २४ हजार ७०४ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, सध्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या ७७ हजार ८ आहे. आजपर्यंत राज्यात करोनामुळे ५२ हजार १५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या १,६२,८४,६१२ नमुन्यांपैकी २१ लाख ५५ हजार ७० नमूने (१३.२३ टक्के) करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ३५ हजार ४९२ जण गृहविलगीकरणात असून, ३ हजार ३३२ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

राज्यात कालच्या तुलनेत अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढून ती आज एकूण ७७ हजार ००८ इतकी झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती ८ हजार २९९ इतकी झाली आहे. तर ठाण्यात ही संख्या ८ हजार ०७६ इतकी. तर, पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५ हजार ००५ इतकी झाली आहे. नाशिक येथे २,९६९, अहमदनगर येथे १,३६१, औरंगाबाद येथे २,६०४, नागपूर येथे १ हजार ००१३, कोल्हापूर येथे ३२५ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णसंख्या पुण्यात असून सर्वात कमी रुग्णसंख्या गोंदिया येथे आहे. येथे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ११५ इतकी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!