Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन

Spread the love

औरंगाबाद – चिकलठाणा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात गांधेलीतील आरोपींना न्या.मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार गांधेली गावात २८ डिसेंबर २० रोजी गावातील रहिवासी दिलीप तळेकर,सय्यद अय्युब सय्यद हलीम, स.सुबान स.मन्सा,स.इसाक स.युसुफ यांना गावातीलच रहिवासी असणारे जावेद सरदार पटेल आणि त्यांचे चार साथीदार लाथा बुक्क्याने मारहाण करत होते. ही घटना रस्त्याने कामानिमित्त जाणार्‍या अलका आपटे यांनी पाहिल्यानंतर भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला.

या राजकीय  वैमनस्यातून झालेल्या भांडणाचा दिलीप तळेकर आणि त्यांच्या साथीदाराने गैरफायदा घेतला. दरम्यान घटनेच्या प्रत्यक्षदर्शी अलका आपटे यांना सोबत घेत चिकलठाणा पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल करावयास लावला. या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेले शेख सरदार शेख बिर्‍हम,जावेदखान पठाण आणि जुबेर पठाण यांनी स्वतंत्र याचिके द्वारे चिकलठाणा पोलिस ठाण्याचे एपीआय आणि पोलिसअधिक्षक कार्यालयआणि फिर्यादी अलका आपटे यांनी खोटा अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल  केल्याबाबतची याचिका दाखल केली.

या याचिकेवर खंडपीठाने तज्ज्ञामार्फत निरीक्षण केले. या निरीक्षणात असे समोर आले की, निवडणूकीसाठी दोन राजकिय गट आपापसात हाणामार्‍या करत असतांना फिर्यादी महिलेने भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता तिला एका गटाने जातीवाचक शिवीगाळ करत घटनास्थळावरुन हाकलले अशा आशयाची खोटी फिर्याद २८ डिसेंबर २०मधे चिकलठाणा पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हा गरज नसतांना दाखल करण्यात आला होता. या खटल्यामधे याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. जगदीश देशपांडे, शिवाजी दुधारे, अॅ. प्रशांत नागरगोजे, झिशान झैदी,शासनाच्या वतीने महिला अॅड.आर.पी.गौर,अॅड.मोहनीश थोरात यांनी काम पाहिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!