Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#2021ElectionSchedule : देशातील पाच राज्यांची निवडणूक जाहीर

Spread the love

निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा आज पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. या राज्यांमधील निवडणुका पाहता निवडणूक आयोगाच्या पथकांनीही नुकतीच या राज्यांना भेटी दिल्या आहेत.


पाचही राज्यांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २ मे रोजी जाहीर केला जाईल

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ : २९४ मतदार संघ

 • पश्चिम बंगालमध्ये होणार आठ टप्प्यांत मतदान.
 • पहिला टप्पा : २७ मार्च रोजी मतदान पडणार आहे
 • दुसऱ्या टप्पा : १ एप्रिल रोजी मतदान होईल
 • तिसरा टप्पा : ६ एप्रिल रोजी मतदान
 • चौथा टप्पा : १० एप्रिल रोजी मतदान
 • पाचवा टप्पा : १७ एप्रिल रोजी मतदान
 • सहावा टप्पा : २२ एप्रिल रोजी मतदान
 • सातवा टप्पा : २७ एप्रिल रोजी मतदान
 • आठवा टप्पा : शेवटचा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे

 

पुदुच्चेरी विधानसभा निवडणूक २०२१ : ३० मतदार संघ

 • पुदुच्चेरी ३० मतदारसंघात एकाच टप्प्यात म्हणजेच ६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे

 

तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ : २३४ मतदार संघ

– तामिळनाडूमध्येही एकाच टप्प्यात मतदान पार पडेल. राज्यात ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

केरळ विधानसभा निवडणूक २०२१ : १४० मतदार संघ

– केरळमध्ये सर्व १४ जिल्ह्यांतील १४० विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.

 

आसाम विधानसभा निवडणूक २०२१ : १२६ मतदार संघ

 • आसाममध्ये तीन टप्प्यांत निवडणूक
 • पहिला टप्पा : ४७ जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान
 • दुसरा टप्पा : ४९ जागांसाठी १ एप्रिल रोजी मतदान
 • तिसऱ्या टप्प्यासाठी ४० जागांवर ६ एप्रिल रोजी मतदान

 

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ही माझी शेवटची पत्रकार परिषद असेल. ३० एप्रिल रोजी मी निवृत्त होत आहे. असे सुनील अरोडा(मुख्य निवडणूक आयुक्त) यांनी सांगितले. तसेच नागरिक cVIGIL मोबाईल अॅपच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करू शकतील अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

 • विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांतील उमेदवारांना जास्तीत जास्त ३८ लाख रुपयांचा खर्च करता येईल तर पुदुच्चेरीच्या उमेदवारींना जास्तीत जास्त २२ लाखांचा खर्च करण्याची परवानगी असेल

 

 • रॅलीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मैदानांवरच सभा होतील. पश्चिम बंगाल सहीत सर्वच राज्यांत सुरक्षा दल अगोदरच पाठवले जाणार आहेत

 

 • निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांना करोना नियमांचे पालन गरजेचे राहील. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी केवळ पाच जणांना परवानगी असेल.

 

 • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडेल.

 

 • सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचे लसीकरण केले जाईल.

 

 • मतदानासाठी एका तासाची वेळ वाढविली जाणार आहे

 

 • मतदारांच्या सोईसाठी तब्बल २.७ लाख मतदान केंद्र उभारले जातील.

 

 • यंदाच्या विधानसभा निवडणुकीत १८ कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील

 

 • एकूण ८२४ विधानसभा जागांसाठी मतदान होईल. प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्र हे तळ मजल्यावरच असेल.

 

 • आम्ही सर्व निवडणूक नियोजित राज्यांचा वारंवार दौरा करून आढावा घेतला आहे.

 

 • तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२१ रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे २०२१ रोजी, केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जून रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होत आहे.

 

 • करोना संक्रमण काळात अनेक कर्मचारी आणि अधिकारी करोना संक्रमणाच्या जाळ्यात सापडली. त्यातून ते बाहेर पडले आणि जबाबदारी निभावली. अशा अनेक करोना वीरांचा राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला. करोना संक्रमण काळात पार पडलेल्या बिहार निवडणुका यशस्वी ठरल्या. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या संख्येत मतदान केले : मुख्य निवडणूक आयुक्त

 

 • सुनील अरोडा : करोना संक्रमणाचा धोका लक्षात घेऊनच पाच राज्यांत निवडणुका पार पडतील.

 

 • मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी मेडिकल स्टाफसहीत सर्व करोना योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!