Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : अमरावतीत स्थिती चिंताजनक , १० मृत्यू , रुग्णवाढीचा उद्रेक

Spread the love

अमरावती : राज्य शासनाकडून कोरोना संसर्गावर लोक जागृती बरोबरच कठोर कारवाई केली जात असतानाही अमरावती  जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. बुधवारी दिवसभरात 802 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे तर सर्वाधिक दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर खबरदारीचे उपाय म्हणून संपूर्ण शहर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. सुपर स्पेडरच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहे. आजपासून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची वाहने  जप्त करण्याचे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. अत्यावश्यक सेवेसाठीच पेट्रोल पंपावरून पेट्रोल मिळणार आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असतानाही अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे शहरात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मृतांची संख्या 481 वर पोचलेली आहे. बुधवारी जिल्ह्यात 231165 चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 802 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. अमरावती जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रुग्णाचा दर हा 34 टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, अमरावती शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अमरावती शहरासह अन्य दोन ठिकाणी जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा केली होती. सकाळी 8 ते 3 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू साठी लोकांना मुभा दिली होती. मात्र, लोकांनी जीवनावश्यक वस्तूच्या नावाखाली मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून पूर्णपणे लॉकडाउनचा फज्जा उडवला आहे. अनेक लोकं रस्त्यावर उतरत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने हा आकडा पुन्हा वाढू शकतो, अशी भीती वर्तवली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!