Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : दोन वाहन चोर गजाआड, चोरीच्या चार दुचाकी जप्त सिडको पोलिसांची कारवाई

Spread the love

औरंंंगाबाद : शहराच्या विविध भागातून दुचाकी वाहने चोरी करणा-या दोघांना सिडको पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने पाठलाग करून पकडले. संदिप नारायण पवार (वय ३१, रा. मु.पो. पळशी), संजु रमेश दाभाडे, (३२, रा. मिसारवाडी) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वाहनचोरट्यांची नावे असून दोघांच्या ताब्यातून चोरीच्या चार दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या असल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी बुधवारी (दि.२४) कळवली.

सिडको पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, पोलिस अंमलदार नरसींग पवार, सुभाष शेवाळे, सुरेश भिसे, स्वप्नील रत्नपारखी, विशाल सोनवणे आदींचे पथक मंगळवारी दुपारी टिव्ही सेंटर भागात गस्तीवर होते. त्यावेळी संदीप पवार हा दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफएफ-७२५९) वर भरधाव वेगाने जात होता. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता, तो पोलिसांना चकमा देवून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. पोलिसांनी दुचाकीविषयी चौकशी केली असता त्याने सदरील दुचाकी जैस्वाल हॉल समोरून चोरली असल्याची कबूली दिली.
पोलिसांनी संदीप पवार याच्या घरातून दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफजे-६८८४) हस्तगत केली. त्याचप्रमाणे विशेष पथकाने संजु दाभाडे याला ताब्यात घेत त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त दीपक गिNहे, सहाय्यक पोलिस आयुक्त निशीकांत भुजबळ, पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकाने केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!