Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शरद पवार यांचे 1 मार्च पर्यंत राज्यातील सार्व कार्यक्रम रद्द

Spread the love

राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे, अशा काळात राज्यातील धार्मिक, सामाजिक, राजकीय, जत्रा, यात्रा, रद्द कराव्यात असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्च 1 पर्यंत राज्यातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दररोज वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा कार्यक्रमात सहभागी होत असतात. पवार यांच्यासोबत अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करतात. सध्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांनी त्यांचे सार्वजनिक, राजकीय कार्यक्रम 1 मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात गेल्या तीन दिवसांत चार कॅबिनेट मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात विशेष म्हणजे सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक मंत्री आहेत. जलसंपदामंत्री एनसीपी अध्यक्ष जयंत पाटील, अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व मंत्री विलगीकरणात असून या सर्व मंत्र्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!