सोशल मिडियावर लॉकडाऊनच्या जुन्या पोस्ट व्हायरल केल्यास होणार कारवाई

Spread the love

राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती सध्या चिंताजनक झाली आहे. कोरोना रुग्ण राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाढणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब असून प्रशासन याबाबत नांदेड जिल्ह्यांतर्गत योग्य ती  खबरदारी घेत आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पुर्णत: अटोक्यात असून यात नागरिकांची भुमिका खूप महत्वाची आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये तसेच, मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात स्वच्छ करणे अथवा सॅनिटायजर वापरणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे. याबाबत पुरेशी जनजागृतीही आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. नागरिकांनी जर संयमी जबाबदारी पार पाडली तर जिल्हा प्रशासनाला कठोर पावले उचलायची वेळ येणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

नांदेड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत असल्याच्या बातम्या, संदेश हे पुर्णत: चुकीचे असून ज्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर अथवा ट्विटर, इतर कोणत्याही सोशल मिडियावर जर कोणी हे संदेश शेअर केले तर त्यांच्या  विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

जुन्या लॉकडाऊनच्या पोस्ट होत आहेत व्हायरल

काही जुन्या माहितीचे व्हिडीओ, फोटो वापरत ठराविक भागांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याच्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत. नुतेच पुणे आणि पिंपरी चिंचव़ड येथेही लॉकडाऊन लागू केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. मुख्य़ म्हणजे यामुळे जनमानसात संभ्रमाचे वातावरणही पाहायला मिळत आहे. पण, तूर्तास पुण्यात कोणत्याही प्रकारच्या लॉकडाऊनची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असे असले तरीही कोरोनावर ताबा मिळवण्यासाठी म्हणून आखून दिलेल्या नियमांचे पालन न झाल्यास मात्र लॉकडाऊनपासून आपण काही दूर नाही, ही बाबही लक्षात ठेवणे तितकंच महत्त्वाचं आहे.

Leave a Reply

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.