Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी

Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी.

#CurrentNewsUpdate

वाशिम जिल्ह्यात आजपासून रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी. रुग्णवाहिका, औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी, ऑटोरिक्षा, हायवे वरील पेट्रोलपंप व ढाबे एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग वगळता सर्व आस्थापने सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मुभा. आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद, लग्न समारंभासाठी पूर्व परवानगी आवश्यक.

 

अमरावती जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रुग्णांचा स्फोट. आज दिवसभरात अमरावती जिल्ह्यात तब्बल 727 कोरोना रुग्ण आढळले. वर्ष भरातील सर्वात मोठी रुग्णसंख्या. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 28 हजार 648 वर.

 

अमरावती जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रुग्णांचा स्फोट. आज दिवसभरात अमरावती जिल्ह्यात तब्बल 727 कोरोना रुग्ण आढळले. वर्ष भरातील सर्वात मोठी रुग्णसंख्या. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 28 हजार 648 वर.

 

यवतमाळमध्ये किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सभेला परवानगी नसताना आझाद मैदानात घोषणाबाजी व भाषण दिल्याने कारवाई.

 

परभणी जिल्हयात प्रशासनाकडून पुन्हा काही निर्बंध. 5 ते 9 पर्यंत च्या सर्व शाळा बंद,11 वीचेही वर्ग बंद. जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार 15 मार्चपर्यंत बंद. कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात पुन्हा निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान,या आदेशाचे पालन न करणार्याहविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल,असाही इशारा जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आदेशात दिला आहे.

 

कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात पुन्हा निर्बंध घालण्यास सुरुवात केलीय. 5 वी ते 9 वी पर्यंतच्या सर्व शाळा, 11 वीचे सर्व वर्ग 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर 15 मार्चपर्यंत जिल्हाभरातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवावेत असे आदेश बजावले आहेत. महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, आदींनी या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी त्यांच्यावर याबाबत जबाबदारी राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, या आदेशाचे पालन न करणार्‍याविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल, असाही इशारा जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आदेशात दिला आहे.

 

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून शिवजयंती साजरी करण्याच्या निमित्ताने मोठी गर्दी केल्याबद्दल मिरज मधील 2 मंडळावर गुन्हे दाखल , संयुक्त मंडळ आणि शिव इच्छा मंडळ अशा 2 मंडळातील एकूण 13 सदस्यावर मिरज पोलीसानी गुन्हे केले दाखल , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या अटींचे पालन न करणे, मोठी गर्दी जमवणे असे गुन्हे पोलिसांनी दाखल करत साऊड सिस्टीमसह अन्य साहित्य घेतले ताब्यात

 

पुणे जिल्ह्यातील सणसवडी एम आय डी सी मधील सिंटॅक्स- बी ए पी एल या कंपनीला आग लागली आहे. औद्योगिक वापरासाठी लागणारे प्लास्टिकचे पार्टस तयार करणारी ही कंपनी आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले आहेत.

 

#RainUpdate 

गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्याला चांगलंच झोडपलंय. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे हाती आलेल्या पिकांचे मात्र अतोनात नुकसान नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बार्शी, माढा, मोहोळ, अक्कलकोट तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील ज्वारी, गहू, द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यातील तापमान देखील घसरले. हवेत असलेल्या गारव्यामुळे पिकांवर कीड पडण्याची शक्यता देखील आहे. अवघ्या काही दिवसात ज्वारीची काढणी केली जाणार होती. मात्र आता ही सगळी पिकं झोपल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच चिंतातुर होते त्यात दोन झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांची स्वप्नंच हिरवून घेतली आहेत. शासनाने तात्काळ या पिकांचे पंचनामे करून मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

 

नांदेड जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील अर्धापूर, मुखेड, नांदेड, नायगाव,बिलोली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला ज्वारी, गहु, केळी, भुईमूग,हरभरा पिके भुईसपाट होऊन मोठे नुकसान झालंय. टमाटा, वांगी, मिर्ची हा भाजीपाला आणि फळबागांचं ही मोठं नुकसान झालंय.

 

परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस जोरदार अवकाळी पाऊस बरसला यामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला असून आज जिल्ह्याचे तापमान हे 10.7 अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे. शिवाय अनेक ठिकाणी धुक्याची चादर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गोदकाठी वसलेल्या गंगाखेड शहरावर आज सकाळपासूनच सर्वत्र दाट धुकं पडलंय त्यामुळे गंगाखेड शहर आज पुर्णपणे धुक्यात हरवले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!