Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जाकिर हुसैन यांच्यावरील हल्ला मोठं षडयंत्र : ममता बॅनर्जी

Spread the love

पश्चिम बंगालचे श्रम राज्यमंत्री जाकिर हुसैन यांच्यावर बुधवारी रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्बने हल्ला केला. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निमतिता रेल्वे स्टेशनवर हा हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये जाकिर हुसैन यांच्यासह जवळपास 26 लोक जखमी झाले आहेत त्यापैकी चौदा जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी त्यांची भेट घेतली. या वेळी ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला त्या म्हणाल्या की, तपास सुरू आहे. हे मोठे षडयंत्र आहे. “काही लोक त्यांच्यावर त्यांच्या पक्षात सामील होण्यासाठी दबाव टाकत होते”, आम्हाला आशा आहे की सत्य बाहेर येईल. दरम्यान, या घटनेत गंभीर जखमींना आम्ही प्रत्येकी पाच लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देणार आहोत. तसेच हे प्रकरण सीआयडी, एसटीएफ आणि सीआयएफकडे सोपवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

हल्ल्यावेळी मंत्री जाकिर हुसेन त्यांच्या सुरक्षा कर्मचार्यांासह निमतिता स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर साधारण 10 वाजता कोलकाता जाणारी ट्रेन पकडण्यासाठी जात होते. दरम्यान ज्यावेळी ही घटना घडली आहे, त्यावेळचा लाइव्ह व्हिडीओ समोर आला आहे. कोलकात्यात तृणमुल काँग्रेसची बैठक होती आणि बैठकीसाठी झाकिर हुसैन रवाना झाले होते. निमतिता स्टेशनच्या दिशेने जात असताना अचानक मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात यांच्या हात आणि पायाला मार लागला असून सध्या त्यांची परिस्थिती स्थीर आहे. यांच्यावर कोलकाताच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!