#CoronaUpdate : नवे नियम लागू ; पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार

Spread the love

मुंबई, पुणे, अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने राज्य सरकार देखील अलर्ट झाले आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला यांना कंटेनमेंट झोन जाहीर करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, असे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबई, पुणे, अमरावती, यवतमाळ, अकोला इथली कोरोनाची परिस्थिती पाहता संबंधित प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत आणि पुन्हा नवे निर्बंध लागू केले आहेत.

मुंबई नवे नियम; 

1) पाचपेक्षा अधिक रुग्‍ण आढळणाऱ्या रहिवाशी इमारती सील करणार

2) लक्षणं नसलेल्‍या कोरोना  रुग्‍णांना होम क्‍वारंटाईन केलं जाईल. त्यांच्या हातावर पूर्वीप्रमाणे शिक्‍के मारले जातील. वॉर्ड वॉर रुम्‍सच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍यावर बारकाईने नजर ठेवली जाईल आणि दिवसातून 5 ते 6  वेळा फोन केला जाईल.

3) कोणत्याही कार्यक्रमात 50 पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकावेळी आढळल्‍यास संबंधित व्‍यक्तींसह संबंधित आस्‍थापनं आणि व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल होणार

4) मास्‍कचा योग्‍यरित्‍या उपयोग न करणाऱ्या तसंच सार्वजनिक जागी थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी 4,800 मार्शल्स

5) मुंबई लोकलमध्ये विना मास्‍क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्‍यासाठी प्रत्‍येक लाईनवर 100 असे एकूण 300 मार्शल्‍स

6) विनामास्‍क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्‍यासाठी आता पोलिसांनाही अधिकार. पोलीसदेखील मार्शल म्‍हणून नागरिकांना दंड आकारून करणार.

7) बीएमसीच्या मालकीच्‍या सर्व इमारती, कार्यालयं, रुग्‍णालयं आदी‍ ठिकाणी आवश्‍यकतेनुसार महापालिकेच्‍या शिक्षकांची नियुक्‍ती करून त्‍यांना विना मास्‍क फिरणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याचे अधिकार

8) सर्वधर्मीय प्रार्थनास्‍थळांच्‍या जागी पुरुषांप्रमाणेच महिला मार्शल असणार. तिथंही विना मास्‍क फिरणं, 50 पेक्षा अधिक व्‍यक्तींनी एकाचवेळी एकत्र येणं अशा नियमांचं उल्‍लंघन केल्‍यास कारवाई

9) खेळाच्‍या मैदानांवर आणि उद्यानांमध्‍ये देखील विना मास्‍क आढळ्यास कारवाई करण्‍यात येईल.

10) मुंबई विमानतळावर ब्राझीलमधून येणाऱ्या प्रवाशांना सक्‍तीने सात दिवसांच्‍या संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवणार

यवतमाळ नवे नियम ;

1) शहरी आणि ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी तसंच जमावानं एकत्र जमू नये.

2) धार्मिक यात्रा, उत्सव, लग्न समारंभ, महोत्सव, स्नेहसम्मेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठकांसाठी केवळ 50 व्यक्तींना उपस्थित राहता येईल.

3) लग्न समारंभ, सामूहिक किंवा घरगुती कार्यक्रम 50 व्यक्तींच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत रात्री 10 वाजेपर्यंत करण्यास परवानगी

4) लग्न समारंभासाठी स्थानिक प्रशासन (तहसिलदार, मुख्याधिकारी व पोलिस विभाग) यांना माहिती देणं आवश्यक

5) मिरवणूक आणि रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध

6) अंत्यविधीप्रसंगी 20 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगच पालन करावं.

7) हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्क, हँड सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे बंधनकारक

8) धार्मिक संस्था, प्रार्थना स्थळे आणि धार्मिक संस्थानामध्ये, कार्यक्रमामध्ये गर्दी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

9) सर्व दुकाने, बाजारपेठ रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील

10) जिल्ह्यातील इयत्ता 5 ते 9 पर्यंत सुरू असलेल्या फक्त नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस दिनांक 28 फेब्रुवारी 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील. या कालावधीत ऑनलाईन, दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील.

11) रेस्टारंट, हॉटेल सकाळी 8 ते रात्री 9.30 वाजता पर्यंत सुरू ठेवण्यात मुभा देण्यात येत आहे. तसंच होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री 11.30 वाजेपर्यंत मुभा राहील.

12) जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा, पोलिस विभागाने गर्दीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याकरीता बॅरेकेटस लावण्याची कार्यवाही करावी.

13) रिक्षा चालक, खाजगी फोर व्हिलर, बसेस यामध्ये मास्कचा, हॅन्ड सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक राहील.

अमरावतीत नवे नियम;

1) जिल्ह्यात रविवारी लॉकडाऊन पाळला जाणार आहे. हा लॉकडाऊन शनिवारी सायंकाळी रात्री आठ वाजल्यापासून सुरू होणार असून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.

2) रविवारी जिल्ह्यात कडकडीत बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवा राहतील सुरू राहतील. दूध, भाजीपाला, दुकानं सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत मिळेल.

3) हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार शनिवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.

4) शहरी, ग्रामीण भागातील खासगी आणि सरकारी वाहतूक सेवा बंद राहीस. महापालिका भागातील बस सेवा आणि ऑटो रिक्षादेखील बंद राहतील. रुग्णांसाठी, आपात्कालीन परिस्थितीत आणि अत्यावश्यक सेवेसाठी ऑटो रिक्षा सेवा आणि खासगी वाहनास परवानगी. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू असेल.

5) जीम, व्यायमशाळा, स्विमिंग पूल ठरलेल्या कालावधीत बंद राहतील.

6) चित्रपटगृहं, वाचनालय, ग्रंथालय, ब्युटीपार्लरदेखील उपरोक्त काळात बंद राहिल.

7) पर्यटनं स्थळंही बंद राहतील.

8) बँक, पतपेढी, आर्थिक बाबींशी संबंधित संस्था बंद राहतील.

9) रुग्णालयं, क्लिनिक, मेडिकल अशा अत्यावश्यक सेवा सुरू राहतील

10) पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.

अकोला

शनिवारी रात्री 8.00 ते सोमवारी सकाळी 6.00 वाजेपर्यत अकोला जिल्ह्यामध्ये पुढील आदेशापर्यंत संपूर्णतः संचारवंदी लागू असेल. या कालावधीत कोणत्याही व्यक्तीस मुक्त संचार करता येणार नाही

 

२२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा शहरातील शाळा बंद

२२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा शहरातील शाळा बंद

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.