#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : उद्या चार तास सुरू रहाणार ‘रेल रोको’ आंदोलन

Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी.

 राज्यात 4 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

राज्यात 4,787 नवे कोरोना रुग्ण आढळले

दिवसभरात 3,853 रुग्णांना डिस्चार्ज

दिवसभरात 40 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95.62 टक्के

राज्यात एकूण 38,013 अॅक्टिव्ह रुग्ण

तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

– राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) बंगळुरूमध्ये दरोड्याच्या प्रकरणात जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) च्या 11 दहशतवाद्यांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे: एनआयए

– मुंबईत विनाअनुदानित शिक्षकांचे वर्षा गायकवाडांच्या बंगल्यासमोर आंदोलन शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिल होते आश्वासन दिले होते पण ‘वर्षा गायकवाडांनी आश्वासन पाळले नाही’ ‘आश्वासन देऊनही कॅबिनेटमध्ये निर्णय नाही’ ‘विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान कधी?’ या मुद्यावरून शिक्षक आक्रमक झाले आहे. पोलिसांकडून आंदोलक शिक्षकांची धरपकड सुरू आहे.

– ‘राज्यात ‘बर्ड फ्लू’ पूर्णपणे नियंत्रणात’ पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती

– आम्ही 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते संध्याकाळी 4 या वेळेत देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलनात शांततापूर्ण निषेध करू. गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही प्रवाशांना रिफ्रेशमेंट्स देऊ : किसान आंदोलन समिती, गाझीपूर सीमा समितीचे प्रवक्ते जगतरसिंग बाजवा

– संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज मुजफ्फरपुरात अखिल भारतीय कृषक खेत मजदूर संघटनेच्या वतीने व्हीएचपीच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा शांततापूर्ण निषेध करण्यात आला.  दरम्यान, त्यांनी उद्या (18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 ) होणाऱ्या ‘रेल रोको’ आंदोलणासाठी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूरच्या जेलमध्ये बंद असलेल्या आसाराम बापू याला मंगळवारी  ह्रदयविकाराचा झटका आल्याने तातडीने कारागृहातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तब्येत बिघडल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्याला अधिक उपचारासाठी महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

Image result for asaram bapu

माजी केंद्रीय मंत्री विजय सांपला यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

एमजे अकबर यांच्या मानहानीचा खटला कोर्टने फेटाळून लावला

एमजे अकबर यांच्या मानहानीचा खटला कोर्टने फेटाळून लावला

– भाजप खासदार उदयनराजे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही दोघांत अर्धा तास चर्चा, उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती

– औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना पाहायला मिळते आहे. महिनाभरापूर्वी औरंगाबादेत रोज 30 ते 40 रुग्ण समोर येर मात्र आता पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या तीन अंकावर जाऊन पोचली आहे . काल दिवसभरात 120 रूग्ण आढळून आलेले आहेत. सोमवारी हा आकडा 77 इतका होता. औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाची रुग्णसंख्या तीन आकडी गेल्यानंतर कोरोना पुन्हा वाढणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

– गोंदिया -भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज सकाळी गोंदिया ,गोरेगाव ,सडक अर्जुनी तर भंडारा जिल्यातील भंडारा ,तुमसर आणि लाखनी ,पवनी तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. याचा फटका गहू,चना,वाटाणा,लाखोरी,तूर आणि पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

– उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका बियर बार मध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या भांडणात बियर बार मालकावरती रिव्हॉल्व्हरने गोळीबार करून फरार झालेल्या पैकी एक आरोपी ग्रामस्थांनी पकडून दिला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भंडारा शिवारात हॉटेल रिलॅक्स येथे तीन फेब्रुवारीला हॉटेल मालकावर गोळीबार झाला होता, या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी मंगळवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील कोठडीतून फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू.

– अकोला जिल्ह्यात आज सकाळी अवकाळी पावसाला सुरुवात.जिल्ह्यातील अकोट तेल्हारा भागात अवकाळी पावसाच्या सरी.

Leave a Reply

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.