Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

Spread the love

जळगाव,बेडरपुरा येथे तीन वर्षीयच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या किशोर उर्फ पिंटू निंबा भोई (वय ३८,रा.बेडरपुरा, नगरदेवळा, ता.पाचोरा) याला सत्र न्यायालयाने बुधवारी मरेपर्यंत जन्मठेप व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला.

२६ मार्च २०१९ रोजी दुपारी दोन वाजता पीडित बालिका गल्लीत खेळत होती तर तिची आई घरात काम करीत होती. त्यावेळी किशोर भोई याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पीडितेला घरात बोलावून अत्याचार केला. याचवेळी पीडितेचा रडण्याचा आवाज आल्याने तिची आई धावून आली असता किशोर याच्या घराचा दरवाजा बंद होता. आवाज देऊनही तो दरवाजा उघडत नव्हता. आजुबाजुच्या लोकांनी धाव घेऊन आवाज दिला असता त्याने अर्धनग्न अवस्थेत दरवाजा उघडून तेथून पळ काढला. पीडित बालिकेने आईला सगळी घटना सांगितली. त्यानंतर आईने त्याच स्थितीत पाचोरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यावरुन कलम ३५४ अ व ३७६ तसेच बाललैगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम १२ चे कलम ३,४,५ एम ६,७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खटला सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात चालला. सरकारतर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सरकारी वकील यांनी साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्यानंतर ३ वर्ष वयाच्या चिमुरडीसोबत झालेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे, त्यामुळे समाजातील अशा प्रवृत्ती रोकण्यासाठी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असा प्रभावी युक्तीवाद करुन काही पुरावे न्यायालयासमोर सादर केले. यात पीडितेची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली. त्यामुळे न्यायालयाने ३७६ अ व ३७६ ब अन्वये किशोर भोई याला दोषी धरुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी देविदास कोळी यांची या खटल्यात मोलाची मदत झाली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!