Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

खंडपीठाने जळगाव जिल्हासत्रन्यायाधिशला फटकारले

Spread the love

औरंगाबाद – पोक्सोसहित बलात्काराच्या गुन्ह्यात अल्पवयीन पिडीतेने सहमतीने शरीर संबंधाला मान्यता दिल्याचे खरे मानंत जळगाव जिल्हासत्रन्यायालयानेआरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी जळगाव जिल्हासत्र न्यायाधिशला फटकारले आहे.

मोहित सुभाष चव्हाण असे जामिनावर मोकाट फिरणार्‍या आरोपीचे नाव आहे.२०१४-१५साला पासून पिडीतेच्या घरात घूसून आरोपी तिचे शोषण करंत होता. हा प्रकार पिडीतेच्या पालकांच्या लक्षात आल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. अल्पवयीन मुलीचे शोषण केल्यावर सज्ञान झाल्यावर लग्न करु असे आरोपीच्या आईने म्हटल्यानंतर पिडीता व तिचे पालक यांनी पिडीता १८वर्षाची होण्याची वाट पाहिली.तरीही लग्नासाठी आरोपी टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यावर पिडीतेने डिसेंबर २०१९मध्ये पोक्सो बलात्काराची फिर्याद पोलिसांकडे दिली. त्यानंतर आरोपीने जळगाव जिल्हासत्र न्यायालयात या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. हा जामिन मंजूर झाल्यावर पिडीतेने खंडपीठात धाव घेतली. न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी निकालात म्हटले आहे की , न्यायदानाचा अपरिपक्व नमूना या प्रकरणात पाहावयास मिळतो. विद्वान न्यायधिशांचा दृष्टीकोन दिसून येतो. या न्यायधिशांकडे न्यायदानाची पूर्ण क्षमता नसल्याचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी निकालपत्रात नमूद केले आहे.या प्रकरणी तक्रारदारातर्फे अँड.विजय पाटील यांनी काम पाहिले. तर सरकारच्या वतीने अँड.पी.जी.बोराडे आणि आरोपीच्या वतीने अँड.सतेज जाधव यांनीकाम पाहिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!