Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नांदेडमधून अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यास कोर्टाने सोडले

Spread the love

नांदेड येथे खलिस्तानवादी दहशतवादी म्हणून पकडण्यात आलेला गुरपिंदरसिंग संतासिंग उर्फ ग्यानी निर्दोष आहे. पंजाब पोलिसांनी कोर्टात रिपोर्ट दाखल करून त्याला सोडून दिले आहे. तो, पंजाब राज्यातील ता. गुरुसर जिल्हा मुक्तसर येथील रहिवाशी आहे. अटकेनंतर न्यायालयात हजर करून प्रवासी रिमांडवर त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

नांदेड येथील शिकारघाट परिसरात पंजाब पोलीस व नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कार्यवाही करत 7 फेब्रुवारीला गुरपिंदरसिंग संतासिंग नावाच्या 33 वर्षीय पंजाबी व्यक्तीला खलिस्तानी दहशतवादी असल्याच्या संशयातून अटक करण्यात आली होती. गुरपिंदर सिंग हा पंजाब राज्यातील ता. गुरुसर जिल्हा. मुक्तसर येथील राहिवाशी आहे. खलिस्तान जिंदाबाद संघटनेच्या चार दाहशतवाद्या विरोधात पंजाब येथे बंदी आदेश घालण्यात आले आहे. त्यातील एक आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याने पंजाब पोलिसांना गुरपिंदरसिंग संतासिंग हा आमचा साथीदार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पंजाब पोलीस व स्थनिक गुन्हे शाखा नांदेड यांनी संयुक्त कार्यवाही करत गुरपिंदर सिंग याला नांदेड येथे अटक करून प्रवासी रिमांडवर घेऊन पंजाबला रवाना करण्यात आले. मात्र, पंजाब पोलिसांच्या पुढील तपासात गुरपिंदर सिंग हा व्यक्ति दोषी न आढळल्यामुळे पंजाब पोलिसांनी स्वतः कोर्टात रिपोर्ट दाखल करून तो निर्दोश असल्याचे सांगितले व त्याला सोडून देण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!