पोलिसांची नाकाबंदी भेदून चोरट्यांनी तीन दुचाकी लांबवल्या

औरंंगाबाद : गेल्या काही महिन्यापासून शहर परिसरात वाहन चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. वाहन चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी गेल्या तीन ते चार दिवसापासून शहराच्या विविध भागात दिवसा नाकाबंदी करून संशयीत वाहनधारकांची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांची नाकाबंदी सुरू असतांना देखील चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून तीन दुचाकी लंपास केल्या आहेत.
प्रविण बापुराव डोंगरे (वय २६, रा.बालाजीनगर, महुनगर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईयू-९९०२) चोरट्याने ९ फेब्रुवारी रोजी उस्मानपुरा परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकातून चोरून नेली. शंकर मारोतीराव खराटे (वय ३८, रा.अलोकनगर, सातारा परिसर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२६-एक्यू-३७७९) चोरट्याने ८ फेब्रुवारी रोजी शहानुर मियॉ दर्गा चौकातील डी-मार्ट जवळून चोरून नेली. पवनसिंग उत्तमसिंग राजपुत (वय ३६, रा.सदाशिवनगर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईआर-७३३७) चोरट्याने ९ फेब्रुवारी घराजवळून चोरून नेली. विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे उस्मापुरा, जवाहरनगर आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.