मोक्कातील फरार दरोडेखोरांना बेड्या, पोलिस अधिक्षकांकडून रिवाॅर्ड

औरंगाबाद – तीन वर्षांपासून मोक्कातील फरार आरोपी व जालना बीड औरंगाबाद जिल्ह्यात दरोडे घालणार्या दोन गुन्हेगारांना ग्रामीण गुन्हेशाखेने बेड्या ठोकल्या. या कारवाईची दखल घेत पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पोलिसपथकाला रिवाॅर्ड दिल्याची माहिती पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.
हैदर गौतम पवार(३९) आणि दिपक गौतम पवार(३५) रा.घेवरी अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरील कारवाईत बीड पोलिसांचाही समावेश होता. वरीलपैकी हैदर पवार ला बीड पोलिसांकडे तपासासाठी स्वाधीन करण्यात आले. बीड आणि औरंगाबाद पोलिसांचे १८पोलिसांचे पथक पाचोड जवळील टाकळीअंबड ता. पैठण या भागात दबा धरुन बसलेल्या वरील दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या. वरील कारवाई पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पीएसआय संदीप सोळंके, गणेश राऊत,पोलिस कर्मचारी वसंत लटपटे, श्रीमंत भालेराव, धीरज जाधव, वाल्मिक निकम, योगेश तरमाळै यांनी सहभाग घेतला होता.