Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भरलेल्या विहिरीत वाहन पडून २ ठार

Spread the love

जालना । बीडहून बुलढाण्याकडे ब्रीजा सुझुकी एमएच २२, एएम २७०१ ही गाडी चालकाचा ताबा सुटल्यामुळे जामवाडी शिवारातील युवराज धाब्यासमोरील रस्त्याच्या विहिरीत जाऊन पडली. सायंकाळी ६.३० ते पावणे सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यात दोन जण ठार झाले असून एका मृतदेहाच्या खिशातील आधार कार्डवरुन मयताचे नाव अब्दुल मान्नान शेख सगीर रा. बीड आणि दुसऱ्या मयताचे नाव अझहर कुरेशी असे आहे. हे बीड शहरातील शाहूनगर भागात असलेले सागर फेब्रिकेशन चालवीत होते. हे दोघे बीड मधुन चिखली येथे अझहर कुरेशी यांच्या सासरवाडीत चालले होते.  काठोकाठ भरलेल्या विहिरीत ही गाडी पडल्यामुळे जालना पोलिसांना बचावात अडथळे आल्याने उशीरापर्यंत बचावकार्य सुरू होते. अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांनी महानायकशी बोलतांना दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!