Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जावई हा शब्द काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही… जावई प्रत्येक घरात असतो – निर्मला सीतारामन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Spread the love

शुक्रवारी (12 फेब्रुवारी) राज्यसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुद्रा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना टोला लगावला. “मुद्रा योजनेअंतर्गत २७ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेची कर्ज देण्यात आली आहेत. ही कर्ज कोणी जावयाने घेतली का?,” असे म्हणत सीतारामन यांनी हा  टोला लगावला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून विरोध करण्यात आला तेव्हा त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत जावई हा शब्द काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही… जावई प्रत्येक घरात असतो परंतु काँग्रेससाठी जावई हे एक विशेषनाम आहे, असे म्हणत हल्लाबोल केला.

राज्यसभेतील चर्चेदरम्यान निर्मला सीतारामन यांनी डिजिटल ट्रान्झॅक्शनवर विचारलेल्या प्रश्नाचेही उत्तर दिले. त्या म्हणाल्या, “ऑगस्ट २०१६ ते जानेवारी २०२० पर्यंत युपीआयद्वारे एकूण ३.६ लाख कोटी रूपयांचे ट्रान्झॅक्शन झाले आहे. युपीआयचा श्रीमंत व्यक्ती करत नाहीत. त्याचा वापर मध्यमवर्गीय व्यक्ती आणि छोटे व्यापारी करतात. ही लोकं कोण आहे? सरकारने कोणाच्या जावयासाठी युपीआय तयार केले नाही,” असेही त्या यावेळी म्हणाल्या. जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून मनरेगा योजनेतील त्रुटी दूर करण्याचे काम करण्यात आले आहे. या आर्थिक वर्षामध्ये मनरेगा योजनेअंतर्गत १.११ लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गरीबांवर महासाथीचा होणारा परिणाम कमी करण्यासाठी ही तरतूद करण्यात आली असून आतापर्यंत ९० हजार ४०० कोटी रूपयांची रक्कम वितरीत करण्यात आल्याचे ही  त्यांनी यावेळी सांगितले. “सरकारवर भांडवलदारांच्या संगनमताचा आरोप करणे चुकीचे आहे. गावांमध्ये रस्त्यांची निर्मिती, प्रत्येक गावात वीज, छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकण्यासारख्या योजना गरीबांसाठी होत्या. त्या भांडवलदारांसाठी नव्हत्य़ा. अर्थव्यवस्थेत करण्यात आलेल्या तरतुदींमुळे आत्मनिर्भर भारताला चालना मिळणार आहे,” असेही सीतारामन म्हणाल्या. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही भाष्य केले. पश्चिम बंगालकडून छोट्या आणि सीमांत शेकऱ्यांची यादी मिळाली नसल्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना २०२१-२२ अंतर्गत १० हजार कोटी रूपयांची तरतूद कमी करण्यात आली आहे. आमच्या कार्यकाळात तरतूद केलेल्या रकमेचा वापर वाढला असल्याचेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!