Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कुत्रा शोधणार आता कोरोनाचे रुग्ण !!

Spread the love

कुत्र्याच्या मदतीने गुन्हेगारांचा शोध घेतला जातो , हे सर्वांनाच माहित आहे पण आता याच प्रशिक्षित कुत्र्यांच्या मदतीने कोरोनाचे रुग्ण शोधण्यास मदत होणार आहे. भारतीय लष्कराने हा उपाय शोधला असून आता श्वानांकडून करोनाबाधित व्यक्तीचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी लष्कराकडून श्वानांना विशेष असे  प्रशिक्षण देण्यात आले आहे. घामाच्या आणि मुत्राच्या नमुन्यातून संबंधित व्यक्ती करोनाबाधित आहे किंवा नाही हे कळू शकणार आहे. लॅब्रेडोर आणि स्वदेशी जातीच्या काही खास श्वानानांच अशा प्रकारे करोनाबाधित व्यक्तीच्या नमुन्यातून रिअल टाइम शोध घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

श्वानांना उपजतच ९५ टक्के संवेदनशीलता असल्याने त्यांचा यासाठी वापर केला जाणार असल्याचे या श्वानांचे प्रशिक्षक कर्नल सुरेंदर सैनी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. कर्नल सैनी म्हणाले, “भारतीय लष्कराचे संबंधित युनिट प्रशिक्षणाच्या चाचण्या घेत असून या कामगिरीसाठी श्वानांना तैनातही करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेली व्यक्ती शोधणे हे रिअल टाइम असणार आहे. नमुन्यांमुळे या श्वानांना संसर्ग होत नाही कारण हे नमुन्यांचे नर्जंतुकीकरण केले जाते, त्यामुळे त्यामध्ये विषाणू नसतो. यामध्ये केवळ व्होलाटाईल मेटाबोलिक बायोमेकर असते, ही जैविक प्रक्रिया म्हणजे एक प्रकारे करोना विषाणूचे प्रतिरुपचं असतं”

दरम्यान, श्वान पथकाकडून अशा प्रकारे करोनाबाधित व्यक्ती ओळखण्यासाठी लष्कराने सोमवारी थेट प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या आपल्या निवदेनात लष्कराने म्हटले आहे की, “संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरिरात खास प्रकारचे जैविक घटक तयार होत असतात, ज्याचा शोध खास वैद्यकीय शोध पथकातील श्वानांद्वारे घेता येतो. एएनआयच्या वृत्तानुसार, लष्कराने यासाठी दोन श्वानांना प्रशिक्षण दिले आहे. या श्वानांनी आत्तापर्यंत ३,००० नमुन्यांची तपासणी केली असून त्यात १८ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!