Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#FarmersProtest : ‘अशी’ आखली होती लाल किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना – दीप सिद्धूचा खुलासा

Spread the love

प्रजासत्ताक दिनी आयोजित शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत काही शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर गोंधळ घातला आणि आंदोलनाला हिंसक वळण आले. या हिंसक शेतकरी आंदोलकाच्या गटाचे नेतृत्व करणाऱ्या दीप सिद्धूला अटक करण्यात आले असून त्याने चौकशीत लाल किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना कशी आखली होती, याचा खुलासा केला आहे. पण तो कोणत्याही कट्टरपंथी संघटनेसाठी काम करत नाही, असे  त्याने पोलीस चौकशीत स्पष्ट केले आहे.

पोलीस चौकशीत त्याने अनेक खुलासे केले आहेत. त्याने सांगितले की, शेतकऱ्यांप्रती भावुक होऊन या आंदोलनात सहभाग घेतला होता. लॉकडाऊनमध्ये आणि नंतरच्या काळात हाताला काही काम नव्हतं. त्याचवेळी ऑगस्टमध्ये पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली होती. त्यामुळे तोही या आंदोलनाकडे आकर्षित झाला आहे. दीप सिद्धूने पुढे सांगितले की, तो ज्यावेळी आंदोलनाच्या स्थळी जायचा, तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात युवक यायचे. याचा फायदा घेवून त्याने आपल्या काही समर्थकांच्या मदतीने पोलिसांनी आखून दिलेला नियोजीत मार्ग तोडण्याचा प्लॅन आखला. त्यासाठी त्याने शेतकरी आंदोलनातील स्वयंसेवकांचे काही जॅकेट चोरण्यासही सांगितले. याशिवाय तो 28 नोव्हेंबरला दिल्लीत झालेल्या एका रॅलीतही सहभागी झाला होता.

दीप सिद्धूने प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधीच लाल किल्ला आणि इंडिया गेटपर्यंत जाण्याचा प्लॅन केला होता. पण 26 जानेवारी रोजी तो केवळ लाल किल्ल्यापर्यंतच जावू शकला. फरार आरोपी जुगराज सिंह याला खास धार्मिक ध्वज फडकवण्यासाठीच आणण्यात आले होते असेही पोलीस चौकशीत दीप सिद्धू याने सांगितले आहे.

#FarmersProtest : 26 जानेवारीतील हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी दीप सिंधूला अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने २६ जानेवारीला लाल किल्ल्यात आणि दिल्लीच्या इतर भागांतील हिंसाचारातील मुख्य आरोपी दीप सिद्धूला अटक केली आहे. त्याला शोधण्यासाठी त्याची छायाचित्रे सार्वजनिक क्षेत्रात लावण्यात आले होते. तसेच त्याच्या अटकेवर १ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवसापासून तो फरार होता. पोलिसांनी आरोपींना ९  फेब्रुवारी रोजी अटक केली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!