Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#ChakkaJaamUpdates ; लुधियाना-फिरोजपूर महामार्गावर लंगर सेवा

Spread the love

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी संपूर्ण देशभरात चक्का जाम करण्याचे आवाहन केले होते. दुपारी १२ ते ३ या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने सुरू आहे. देशाच्या मातीशी शेतकऱ्यांना जोडले जाणार आहे. यामुळे नव्या युगाचा जन्म होईल, असा विश्वास राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

दिल्लीत कोणत्याही दुर्घटना घडल्या नाहीत. वाहतुक सुरळीत आहे.  26 जानेवारीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मोठ्या संख्येने जमले आहेत त्यामुळे तेथे सुरक्षा अधिक कडक केली असून अजूनही सुरक्षा दले तैनात आहेत. : चिन्मय बिस्वाल, दिल्ली पोलिस पीआरओ

 

लुधियाना: शेतकर्‍यांनी पुकारलेल्या ‘चक्का जाम’नंतर लुधियाना-फिरोजपूर महामार्गावर लंगर सेवा

हे कायदे  रद्द करण्यासाठी  आम्ही सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. यानंतर आम्ही पुढील नियोजन करू. आम्ही दडपणाखाली सरकारशी चर्चा करणार नाही: राकेश टिकैट,

हरियाणा: देशव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन पलवलजवळील अथन चौकात पलवल-आग्रा महामार्ग रोकलेल्या आंदोलकांनी रुग्णवाहिकेचा मार्ग मोकळा केला. 

तेलंगणा: हैदराबादच्या सरहद्दीवर महामार्गावरील आंदोलकांना पोलिसांनी हटवले

गाझीपूर सीमा (दिल्ली-उत्तर प्रदेश) बंदोबस्त 

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली-एनसीआर भागातील दिल्ली पोलिस, निमलष्करी दलाचे आणि राखीव दलाचे सुमारे ५०,००० जवान तैनात करण्यात आले आहेत.

दिल्ली: शाहीदी पार्क परिसरातील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले

हरियाणा: पलवलजवळील आटोहन चौकात निदर्शन

जम्मू-काश्मीर: जम्मू-पठाणकोट महामार्गावर शेतकरी संघटनांचे ‘चक्का जाम’ आंदोलन.. 

शेतकऱ्यांच आंदोलन सुरू झाल्यापासून यूपी पोलिस आणि प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कायम ठेवली आहे. आम्हाला शेतकरी संघटनांने देखील सहकार्य केल्यामुळे तसेच आज पुरेशी सुरक्षा दल तैनात केल्यामुळे आतापर्यंत कोणतीही अनुचित प्रकार घडलेला नाही.

देशभरातील ‘चक्का जाम’च्या भागाखाली येलहांका पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करणार्‍या निदर्शकांना पोलिसांनी अटक केली. 

पंजाब: (अमृतसर आणि मोहाली)

निदर्शकांनी शाहजहांपूर सीमेजवळ (राजस्थान-हरियाणा) जवळ राष्ट्रीय महामार्ग रोखला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!