Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कुख्यात गुन्हेगाराच्या घरातील जुगार अड्यावर पोलिसांचा छापा 11 जुगारी पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

औरंंगाबाद : कुख्यात गुन्हेगाराच्या गारखेडा परिसरातील घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पुंडलिकनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी अकरा जुगारींना ताब्यात घेऊन ४९ हजार आठशे रुपयांची रोकड जप्त केली. तसेच आठ मोबाइल असा ९० हजार आठशे रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी शुक्रवारी (दि.५) दिली.
गारखेडा परिसरातील कुख्यात गुन्हेगार शेख जावेद उर्फ टिप्या याचा मोठा भाऊ शेख जुबेर उर्फ गुड्डू शेख मकसूद (रा. विजयनगर) हा घरात जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर नवले, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास खटके, धनाजी आढाव, मिरा चव्हाण, सहायक फौजदार विठ्ठल फरताळे, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, संतोष पारधे, प्रविण मुळे, अजय कांबळे, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, जालिंदर मांटे आणि राजेश यदमळ यांनी रात्री पावणेअकराच्या सुमारास छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी युनूस बेग मिर्झा (वय ५०, नारेगाव), सतीश भानुदास होले (वय २८, रा. कन्हैय्यानगर, जालना), प्रभाकर किसन रणदिवे (वय ४३, रा. जवाहर कॉलनी, उत्तमनगर), इम्रान बीन अब्दुल रऊफ (वय ३२, रा. नारेगाव), विजय कैलास खरे (वय २७, रा. कन्हैय्यानगर, जालना), अन्वर कुरेशी फिरोज कुरेशी (वय ३६, रा. पैठणगेट, सब्जीमंडी), शेख खालेद शेख इलियास (वय ३२, रा. बायजीपुरा), राम सुदाम सोनवणे (वय ४०, रा. किलेअर्क, काळा दरवाजा), अक्षय देविदास लगडे (वय २१, रा. विजयनगर, गारखेडा परिसर), शंकर प्रल्हाद खंदारे (वय ३२, रा. कुच्चर वटा, जालना) आणि शेख जुबेर उर्फ गुड्डू शेख मकसूद (वय ३२, रा. विजयनगर, गारखेडा परिसर) यांना पकडले. या जुगार अड्ड्यावर जालन्यातील दोन सराईत जुगारी पोलिसांच्या हाती लागले. या जुगार अड्ड्याशी शेख जावेद उर्फ टिप्याचा संबंध आहे का याची पोलीस तपासणी करत आहेत. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!