Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#FarmerProtest : देशभरातील ‘या’ भागात चक्का जाम आंदोलन होणार नाही

Spread the love

देशभरात केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ६ फेब्रुवारीला दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड हे तीन राज्य वगळता देशभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिली.

शनिवारी (ता.६) आम्ही दिल्लीमध्ये चक्का जाम आंदोलन करणार नाही, पण सर्व सीमाभागात आम्ही शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करणार आहोत. दिल्ली वगळता सर्व राज्यातील प्रमुख राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात येणार आहेत. दुपारी १२ ते ३ या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती दर्शनपाल सिंह यांनी दिली.

दरम्यान उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यामध्ये देखील चक्का जाम आंदोलन करण्यात येणार नाही, यावर भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शिक्कामोर्तब केले आहे. सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता आंदोलन संपेल. त्यानंतर एक मिनीटभर आपापल्या गाड्यांचे हॉर्न वाजवण्यात येतील. इंटरनेट सेवा बंद असल्याने खूप अडचणी येत आहेत, अशी माहिती टिकैत यांनी दिली. देशभरातील नागरिकांनी आपापल्या गावी, आपापल्या भागात चक्का जाम आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे, असे आवाहनही टिकैत यांनी केले. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी नाकाबंदी कायम ठेवली आहे.

 

आमच्याकडे एक निश्चित अहवाल होता त्यानुसार उद्या काही लोक चक्का जामदरम्यान हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा भक्कम पुरावा होता. त्यामुळे जनहित लक्षात घेऊन आम्ही उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये उद्या चक्का जाम न करण्याचे ठेवले आहे: राकेश टिकत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!