Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

Spread the love

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अंतर्गत नेतृत्वाच्या चर्चा चालू असून याच चर्चेचा एक भाग म्हणून अखेर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव अंतिम झाल्याने नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. बुधवारी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस अंतर्गत बदल होत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षबदलाच्या हालचालींना वेग आला आणि या पदासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच काँग्रेस हायकमांडकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावं चर्चेत आहेत. भोर विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मंत्री म्हणून सुद्धा काम केले होते. दुसरे नाव हे सुरेश वारपूडकर यांचे समोर आले आहे. सुरेश वारपूडकर हे पाथरी मतदारसंघामधून निवडून आले आहेत. 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. परभणीमधून 1998-99 मध्ये खासदार सुद्धा होते.

याशिवाय तिसरे नाव अमीन पटेल यांचे आहे . ते मुंबईतील आमदार असून ही त्यांची हि तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. मुस्लिम चेहरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा असला तरी शिवसेना मात्र त्यास तयार होईल का याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.

विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा करण्याचे पवारांचे संकेत

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट आला आहे. “विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचे होते आता ते खुले झाले आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार आहे, असे शरद पवार म्हणाले.

नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी संधी!

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. नव्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असतील.
नाना पटोले यांनी २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून त्यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच वर्षाच्या आताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत पुन्हा त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. २०१९ साली पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली व महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नुकतीच त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आज सकाळी ते महाराष्ट्रात परतले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव निश्चित असल्याचे माध्यमांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार फिल्डिंग लावली असून, तसे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. तर उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसनेदेखील राजकीय चाचपणी चालवली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!