Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुन्हा एकदा एल्गार परिषद , मुख्यमंत्र्यांना फडणवीस यांचे पत्र

Spread the love

पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना याबाबत पत्र लिहिले आहे.

या पत्रात फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे कि , “दि. 30 जानेवारी 2021 रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत. “एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे,” असेही  फडणवीस यांनी म्हटलं आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे कि , “मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल”. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही यावे आणि अशी विधाने करून वातावरण खराब करावे, हे आम्हाला मान्य नाही. ते आपल्यालाही मान्य नसेल, अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्रातील जनता आणि समस्त हिंदू समाज करतोय. या प्रकरणात कठोरातील कठोर आणि तत्काळ कारवाई करावी,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रातून केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!