Union budget 2021-22 | केंद्रीय अर्थसंकल्प लाइव्ह अपडेट्स : बजेटकडे लक्ष लागलेल्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा नाही

Advertisements
Advertisements
Spread the love

Union budget 2021 – 22 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सितारामन सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद करण्यात आलेली असून दोन लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याआधी ही तरतूद ९४ हजार कोटी इतकी होती. याशिवाय करोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तासेच अजून दोन करोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताच शेअर बाजारात मोठी उसळी पहायला मिळाली असून सेन्सेक्स १५०० अंकांनी वधारला आहे.

आयकराच्या संरचनेसंदर्भात कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नसून बजेटकडे लक्ष लागलेल्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळालेला नाही. आयकराच्या संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

एनआरआय नागरिकांना दुहेरी कर प्रणालीतून दिलासा देण्याचा निर्णय – निर्मला सीतारामन

जुन्या कर प्रकरणातल्या तपासासाठी सहा ऐवजी तीन वर्षांचे रेकॉर्ड तपासले जाणार – निर्मला सीतारामन

२०२० मध्ये रेकॉर्डब्रेक ६ कोटी ४८ लाख लोकांनी आयकर रिटर्न भरल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

सोने व चांदी काही प्रमाणात स्वस्त होण्याची चिन्हे, सोन्यावरील शुल्क कपातीची घोषणा

ज्या मोबाइलच्या सुट्ट्या भागांना ० टक्के कस्टम ड्युटी होती ती आता २.५ टक्के – अर्थमंत्री

परवडणाऱ्या घरांना ३१ मार्च २२ पर्यंत कर सवलत – अर्थमंत्री

टॅक्स ऑडिट मर्यादा आता ५ कोटींवरुन १० कोटींवर – अर्थमंत्री

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी सवलत, त्यांना इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही – अर्थमंत्री

करोना संकटापूर्वीच आपण कॉर्पोरेट करात कपात केली, कराचा बोजा कमी केला, परिणामी २०२० या वर्षात आयटी रिटर्नमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली – अर्थमंत्री

करोना काळानंतर जगात आणि आशियात भारताची आघाडीची भूमिका असेल – अर्थमंत्री

२०२०-२१ या वर्षातील वित्तीय तूट जीडीपीच्या ९.५ टक्के, बाजारातून ८० हजार कोटी रुपये उभारणार – अर्थमंत्री

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी १५०० कोटी रुपये. वापरकर्त्यांना काही सवलती मिळणार – अर्थमंत्री

राष्ट्रीय भाषा भाषांतर मिशन – भारतातील प्रमुख भाषांमध्ये इंटरनेटवर माहिती उपलब्ध होईल – अर्थमंत्री

राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत १५ हजार शाळांमध्ये गुणात्मक सुधारणार होणार – अर्थमंत्री

उज्ज्वला योजनेत आणखी एक कोटी लाभधारकांचा समावेश होणार – अर्थमंत्री

ग्रामीण पायाभूत सुविधांसाठीचा निधी ३० हजार कोटींवर ४० हजार कोटींवर

२०१४ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये शेतकऱ्यांनी किती मदत मिळाली या माहितीचं संसदेत सादरीकरण

एअर इंडिया, बीपीसीएल, आयडीबीआय, पवनहंस यांतील निर्गुंतवणूक पूर्ण करण्याचे उद्दिष्ट – अर्थमंत्री

निर्गुंतवणूक करण्यासाठी आराखडा तयार, मोजक्या सरकारी कंपन्या सरकार ठेवणार, बाकी कंपन्या आणि महामंडळांमध्ये हिस्सा विक्री – सीतारामन यांची घोषणा

विमा क्षेत्रात आता ७४ टक्के परकीय गुंतवणूक, विमा क्षेत्रासाठी धाडसी निर्णय

सरकारचा भांवंडली खर्च ५.५४ लाख कोटी, जीडीपीच्या ३४.५ टक्क्यांहून अधिक

राष्ट्रीय रेल्वे योजनेची घोषणा. त्यासाठी १ लाख १० हजार कोटींची तरतूद

देशातील रस्त्यांसाठी १ लाख १८ हजार कोटींची तरतूद. त्यातील २५ हजार कोटी, निवडणूक होत असलेल्या पश्चिम बंगालमधील रस्त्यांसाठी

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५९७६ कोटी, नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटींची तरतूद

नागपूर फेज २ आणि नाशिक मेट्रोसाठीही निधीची तरतूद

आरोग्य क्षेत्राला संजीवनी ; प्रत्येक जिल्ह्यात होणार अत्याधुनिक लॅब

देशातील द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये पाइप गॅस योजनेचा विस्तार – अर्थमंत्री

२०२१ या वर्षात भांडवली खर्चात ३४.५ टक्क्यांची वाढ – अर्थमंत्री

पश्चिम बंगालमधील रस्त्यांसाठी २५ हजार कोटींची तरतूद – अर्थमंत्री

केंद्र सरकार २० हजार रुपयांच्या भांडवलासह वित्तीय विकास संस्थेची स्थापना करणार – अर्थमंत्री

अर्बन क्लिन एअर मिशनसाठी १.४१ लाख कोटी रुपयांची तरतूद

राष्ट्रीय पायाभूत सुविधा धोरण पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात निधी वाढवण्याची गरज – अर्थमंत्री

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह टेक्स्टाईल पार्कची निर्मिती केली जाईल, पुढच्या ३ वर्षात हे काम होईल – अर्थमंत्री

५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी आपली निर्मिती दुप्पट आकड्यांमध्ये वाढायला हवी, हे सर्व वाढवण्यासाठी निर्मिती केंद्रीत सबसिडी – अर्थमंत्री

आरोग्य सुविधांसाठीची तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी १३७ टक्क्यांनी वाढवली – अर्थमंत्री

स्वच्छ हवा यासाठी तरतूद, वाहन स्क्रॅपिंग धोरणात बदल. या धोरणाची सविस्तर माहिती लवकरच शेअर केली जाईल – अर्थमंत्री

जागतिक आरोग्य संघटनेने नेहमीच स्वच्छ पाणी पुरवठ्यावर भर दिला आहे, यासाठी जलजीवन मिशन लाँच केलं जाईल – अर्थमंत्री

या अर्थसंकल्पात आरोग्यासाठीची तरतूद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे – अर्थमंत्री

करोनाविरुद्धचा लढा २०२१ मध्येही सुरुच राहिल, करोनानंतरचा काळ बदलत आहे, या काळात भारत हा एक आशेचा किरण बनला आहे – अर्थमंत्री

भारताकडे आज दोन करोना लस उपलब्ध आहेत, स्वतःच्या नागरिकांसाठीच नव्हे, तर इतर देशांनाही त्याचा फायदा होईल – अर्थमंत्री

आपण परिस्थितीवर लक्ष ठेवलं आणि त्यानुसार नियोजन केलं. पंतप्रधान गरीब कल्याण योजना, ३ आत्मनिर्भर पॅकेज हे एक मिनी बजेट आहे – अर्थमंत्री

करोना संकटाच्या काळातही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी अविरत काम केलं – अर्थमंत्री

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमुळे कोट्यवधी नागरिकांना फायदा झाला, घरी असलेल्या नागरिकांनाही जीवनावश्यक वस्तू मिळाल्या – अर्थमंत्री

अर्थसंकल्पीय भाषणात विरोधकांचा गदारोळ

आतापर्यंत कधीही नव्हती, अशा परिस्थितीत हा अर्थसंकल्प तयार झाला आहे. करोना संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात आहे – अर्थमंत्री

लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात, निर्मला सीतारमन यांच्याकडून अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात

अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प घेऊन संसदेत दाखल, थोड्याच वेळात अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात

थोड्याच वेळात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट

सीतारामन यांच्याकडून डिजिटल बजेटची पहिली झलक सोबत अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर

निर्मला सीतारामन नाॅर्थ ब्लाॅकमध्ये पोहोचल्या

सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला

शेअर बाजाराची तेजीने सुरुवात, गुंतवणूकदारांना ‘बजेट’ची उत्सुकता

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा तिसरा अर्थसंकल्प

Budget 2021 Income Tax अपेक्षांचा संकल्प ; आयकर बदल धूसर मात्र कर सवलतींनी नोकरदारांना खूश करणार

सकाळी ११ वाजता निर्मला सीतारमण यांच्या भाषणाने अर्थसंकल्पाचं सादरीकरण सुरू होईल

आपला तिसरा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारमण राष्ट्रपतींची भेट घेतील. यावेळी अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि अर्थमंत्रालयातील अधिकारी उपस्थित असतील

अर्थमंत्री निर्मला सीतारमण पहिल्यांदाच पेपरलेस बजेट सादर करणार

आपलं सरकार