Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चार जणांचे प्राण गेल्यावर पोलिस आयुक्तांनी केली बीडबायपास रोडची पाहणी

Spread the love

अपघाताची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणार

औरंंगाबाद : गेल्या आठवड्यात बीड बायपास रोडवर एका पाठोपाठ झालेल्या तीन अपघातात चार जणांचे प्राण गेले आहेत. बीड बायपास रोडवर चार जणांचे प्राण गेल्यावर पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी सोमवारी (दि.१) बीड बायपास रोडची पाहणी केली. बायपासवर होणाऱ्या अपघाताची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी अपघातप्रवण स्थळांची पाहणी केल्यानंतर दिली.

अवजड आणि बेफाम धावणाऱ्या वाहनांमुळे बीड बायपास रोड हा मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या आठवड्यात २५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ या काळात बीड बायपास रोडवर तीन भीषण अपघात झाले असून त्यामध्ये चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बीडबायपास रोडवर अपघाताची मालिका सुरू झाल्यावर पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, उपायुक्त मीना मकवाना यांनी बीडबायपास रोडची सोमवारी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे, पोलिस निरीक्षक मुवुंâद देशमुख, वैâलास देशमाने यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, रस्त्याचे काम करणारे कंत्राटदार आदी उपस्थित होते.

पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी महानुभव आश्रम चौकापासून ते बीड बायपास रोडवरील सुर्या लॉन्सपर्यंत असलेल्या अपघात प्रवणस्थळांची पाहणी केली. यावेळी त्यांनी काही नागरिकांशी संवाद साधुन बीड बायपास रोडवरील अपघातांची संख्या कशी कमी करता येईल याबाबत त्यांची मते जाणून घेतली.

गरज पडल्यास अवजड वाहतूकीत बदल करणार

बीड बायपास रोडवरून सकाळी ११ ते दुपारी ४ आणि रात्री ९ ते पहाटे ६ या वेळेत अवजड वाहनांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. उपाय योजना करूनही अपघाताची संख्या कमी न झाल्यास भविष्यात अवजड वाहतूकीच्या वेळेत बदल करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!