Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोक्षदा पाटील यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीनेे कोविड वूमन वॉरिअर्स, द रियल हिरो पुरस्कार

Spread the love

औरंंगाबाद : कोव्हीड-१९ या विषाणूच्या संसर्ग काळात औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भाग सुरक्षीत ठेवून आदर्श निर्माण करणाऱ्या ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने कोविड वूमन वॉरिअर्स, द रियल हिरो हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात पोलिस दलाची खNया अर्थाने कसोटी लागली. कोविड काळात ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमा बंद करून ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा शिरकाव होवू दिला नाही. तसेच या काळात त्यांनी समाजातील सर्व घटक व पोलिस दल यांच्यात सुसंवाद कायम ठेवल्याने जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ग्रामीण पोलिस अधीक्षक पाटील यांनी केलेल्या या कार्याची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेत, त्यांना कोविड वूमन वॉरिअर्स, द रियल हिरो हा पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडून मोक्षदा पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलिस दलातील त्यांचे सहकारी व आप्तस्वकीयांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!