Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : पाण्यात बुडणा-याला पोलिस कर्मचा-याने वाचविले

Spread the love

औरंंंगाबाद : तलावातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय व्यक्ती अचानकपणे बुडत असल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिस कर्मचा-याने आपल्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी घेवून बुडणा-या व्यक्तीला वाचविले. ही घटना गुरूवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हर्सूल जवळील सावंगी तलावात घडली.

राधाकिसन फकीरचंद्र बकले (रा.हर्सूल-सावंगी परिसर) असे तलावात बुडणा-या व्यक्तीचे नाव आहे. तर काकासाहेब बन्सीलाल पंडोरे (वय ५०, रा. एकतानगर) असे त्याला वाचविणाNया व्यक्तीचे नाव आहे. राधाकिसन बकले यांना सावंगी तलावात आलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह झाल्याने ते गुरूवारी रात्री पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. पाण्यात पोहत असतांना ते आतमध्ये जवळपास १०० पुâट आत गेल्यावर ते अचानकपणे बुडू लागल्याने ते जीवांताच्या आकाताने ओरडत होते. हा प्रकार ग्रामीण पोलिस दलातील काकासाहेब पंडोरे यांनी तलावात उडी घेवून राधाकिसन बकले यांना पाण्यातून सुखरूप बाहेर आणून त्यांचे प्राण वाचविले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!