Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : कुरीअर एजन्सीच्या व्यवस्थापकाची हत्या करणारे वर्ष उलटले तरी सापडेना…

Spread the love

औरंंंगाबाद : गुजरातमधील कुरिअर एजन्सीच्या व्यवस्थापकाची भरदिवसा चाकुने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना वर्षभरापूर्वी ३१ जानेवारी २०२० रोजी घडली होती. या घटनेला वर्ष उलटले तरी अद्यापपर्यंत मारेक-यांचा कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नाही. कुरीअर एजन्सीच्या व्यवस्थापकाच्या मारेक-याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके गुजरात, जळगाव, धुळे, अहमदनगर आदी ठिकाणी जावून रिकाम्या हाताने परत आली आहेत.

प्रकाश जसवंतभाई पटेल (वय ३३,रा.गुजरात, ह.मु.नगरखाना गल्ली, गुलमंडी परिसर) हे गुलमंडी परिसरातील नगरखाना गल्लीत असलेल्या राममोहन कुरीअर एजन्सीत व्यवस्थापक म्हणून नोकरीला होते. घटनेच्या दिवशी ३१ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुचाकीवर तोंडाला रूमाल बांधुन आलेल्या तीन मारेकNयांनी केली होती. प्रकाश पटेल यांची हत्या केल्यानंतर तिन्ही मारेकरी दुचाकीवर पळून जातांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाले होते.व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचे नेहमीच गुजरातला जाणे-येणे होते. घटनेच्या दिवशी सकाळीच प्रकाश पटेल गुजरात येथून परत आल्यावर त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेला वर्ष उलटुन गेले तरी अद्यापपर्यंत प्रकाश पटेल यांची हत्या करणारे मारेकरी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. प्रकाश पटेल यांच्या मारेकNयाचा शोध घेण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुन्हेशाखेची चार आणि सिटीचौक पोलिस ठाण्याचे पथक तैनात केले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!