Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : बनावट कागदपत्राआधारे गृहनिर्माण संस्थेचा प्लॉट विकणा-याविरूध्द गुन्हा दाखल

Spread the love

औरंंंगाबाद : गृहनिर्माण संस्थेच्या सहा सभासदांनी बनावट ठराव व कागदपत्रे तयार करुन ३९ लाखांचा प्लॉट अवघ्या साडेपाच लाखात विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१३ ते २०२० या काळात पडेगावातील युवान को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत घडला. अजीज शमशोद्दीन सुराणी, उमेद अमुलक मोती, सिराज शेर मोहम्मद चारनिया, अब्दुल्ला शमशोद्दीन सुराणी, रफिक रजबअली हिराणी आणि उपनिबंधक अंबिका झळके अशी फसवणूक केलेल्या सहा जणांची नावे आहेत.

पडेगावात युवान गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटी आहे. २०१३ ते २०१४ याकाळात सुराणी, मोती, चारनिया आणि हिराणी अशा पाच जणांनी उपनिबंधक अंबिका झळके हिला हाताशी धरुन बनावट ठराव पास करुन घेतला. त्यानंतर या पाचही जणांनी प्लॉटचे बनावट कागदपत्रे तयार केली. कागदपत्रे तयार झाल्यानंतर पाचही जणांनी कवडीमोल भावात संस्थेचा प्लॉट क्र. बी-४८ नातेवाईकांना विकला. हा प्रकार २०१५ ते २०१६ याकाळात लेखापरिक्षणात समोर आला. त्यावरुन २९ जानेवारी रोजी रहीम रफिक अली मोती (४२, रा. राठी टॉवर्स, दशमेशनगर, उस्मानपुरा) यांच्या तक्रारीवरुन छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सचिन वायाळ करत आहेत.

सिगारेट ओढण्यास मनाई करताच चाकुने भोसकले

औरंंंगाबाद : घरासमोर सिगारेट ओढण्यास मनाई करताच चौघांनी मारहाण करुन चाकुने भोसकल्याची घटना २९ जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास कोकणवाडीत घडली. याप्रकरणी निखील बोर्डे, अजय, रावत आणि अजय खरात यांच्याविरुध्द वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोकणवाडी भागातील फारुक कुरेशी शेख चांद कुरेशी (वय ३०) हे चितेगावातील कंपनीत कामाला आहे. रात्री दहाच्या सुमारास मित्र इरफान बेग व इमाद खान यांच्यासोबत घराबाहेर बोलत असताना निखील बोर्डे, अजय, रावत आणि अजय खरात हे तेथे आले. तिघेही कुरेशी यांच्या घरासमोर सिगारेट ओढू लागल्याने त्यांना विरोध केला. त्यावरुन कुरेशी आणि चौघांमध्ये वाद झाला. या वादातून निखील बोर्डेने इमाद खान याच्या डोक्यात रॉड मारला. तसेच अजय व रावत यांनी लोखंडी पाईपने इरफान बेगला मारहाण केली. तर अजय खरात हा इमाद खानला चाकु मारत असताना कुरेशी यांना हातावर वार झेलला. त्यामुळे त्यांच्या हाताला जबर जखम झाली. यावेळी तेथे आलेल्या आणखी पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी व दगडफेक केली. हा प्रकार सुरू असताना कुरेशी व त्यांचा आणखी मित्र अश्रफ उमर खान यांनी जमाव पांगवला. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एस.टी.बसच्या धडकेत दिव्यांग प्रवासी जखमी

औरंंंगाबाद : मुख्य रस्त्यावरुन वळण घेऊन सिडको बसस्थानकात भरधाव वेगात आलेल्या बसने दिलेल्या धडकेत एक दिव्यांग प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानकात घडली. निखील चव्हाण (वय १६, रा.रांजणगाव-शेणपुंजी, ता.गंगापूर) असे एस.टी.बसच्या धडकेत जखमी झालेल्या दिव्यांग प्रवाशाचे नाव आहे.

निखील चव्हाण हा रांजणगावहून सिडकोत राहणा-या मामाच्या घरी आला होता. तिथून तो पून्हा रांजणगावला जाण्यासाठी सिडको बसस्थानकावर आल्यानंतर शहर बसची वाट पाहत उभा होता. त्यावेळी पुणे येथून जालन्याकडे जात असलेल्या एस.टी.बस क्रमांक (एमएच-०९-एफएल-००७५) ने निखील चव्हाण याला धडक दिली. या घटनेत निखील चव्हाण याला जबर मार लागला असून निखीलचे मामा नवनाथ गिरी यांनी त्याला उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, हा अपघात घडल्यानंतर बसचालकाने घटनास्थळावरून धुम ठोकली होती. या घटनेची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!