Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : घरफोड्यांचा धुमाकूळ कायम ; दोन घरे फोडून साहित्य लंपास

Spread the love

औरंंंगाबाद : शहरात घरफोड्यांचा धुमाकूळ सुरूच असून, जाधववाडी आणि मुकुंदवाडी भागात घरे फोडून चोरांनी साहित्य लंपास केले. या घटना नुकत्याच उघडकीस आल्या. दरम्यान, एका प्रकरणी पोलिसांनी घरफोड्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

मुकुंदवाडीतील एक महिला १५ जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास घराला कुलूप लावून ग्राम पंचायत निवडणूकीच्या मतदानासाठी फदार्पूरला गेल्या होत्या. याची संधी साधून चोराने महिलेच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोराने गॅस सिलेंडर, धान्याचे तीन पोते, तीन हजारांच्या साड्या आणि बचतगटाचे एटीएम कार्ड लांबवले. तसेच जाधववाडीतील प्रकाश कडूबा जगताप (वय ६०, रा. गोकुळनगर) हे २९ जानेवारीला बाहेरगावी गेले होते. याची संधी साधून चोराने कडीकोंडा व कुलूप तोडून भरदिवसा त्यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला. याप्रकरणी हर्सूल पोलिसांनी सय्यद सत्तार सय्यद सिकंदर (वय ३०, रा. कादर कॉलनी, मिसारवाडी) याला अटक केली आहे. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारचाकी वाहनांसह दुचाकी लंपास

औरंंंगाबाद : वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवडाभरात भरदिवसा व मध्यरात्री चोरांनी चारचाकी वाहनांसह दोन दुचाकी लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वाहन चोरी रोखण्यासाठी पोलीस दलाकडून होणारे प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याचे या घटनांवरुन दिसून येत आहे.

उल्कानगरीतील प्रशांत रमेश मिस्त्री (वय २९, रा. प्लॉट क्र. २५, हनुमान मंदिराजवळ) यांनी २४ जानेवारीला रात्री नऊच्या सुमारास घरासमोर जीप (एमएच-१८-एए-६६१३) उभी केली होती. चोराने त्यांची जीप बनावट चावीच्या सहाय्याने मध्यरात्री लांबवली. तत्पुर्वी शेख ताहेर शेख करीम (वय ४४, रा. जुना मोंढा, रेंगटीपुरा) यांनी २१ जानेवारीला मध्यरात्री घरासमोर कार (एमएच-४१-व्ही-३८८३) उभी केली होती. चोराने त्यांची देखील कार बनावट चावीच्या सहाय्याने लांबवली. तर जयंत प्रल्हाद बोंडे (वय ४७, रा. नाथ प्रांगण, गारखेडा परिसर) हे चिकलठाणा एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला आहे. २८ जानेवारीला सकाळी नऊच्या सुमारास त्यांनी कंपनीसमोरील पार्किंगमध्ये दुचाकी (एमएच-२०-बी-५०८६) उभी केली होती. त्यानंतर कंपनीत गेल्यावर चोराने हँडल लॉक तोडून त्यांची दुचाकी लंपास केली. तर शेख अकबर शेख अफसर (वय २७, रा. नॅशनल नगर, जालना) हे कामानिमित्त १३ जानेवारीला दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालयात आले होते. त्यावेळी त्यांनी न्यायालयासमोरील पार्किंगमध्ये दुचाकी (एमएच-२०-डीएम-५९८७) उभी केली होती. त्यांची देखील दुचाकी चोराने अध्र्या तासात हँडल लॉक तोडून लंपास केली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेसह मुलीला मारहाण

औरंंंगाबाद : मुलीला मारहाण केल्याचा जाब विचारताच महिलेसह तिच्या मुलीला शिवीगाळ व मारहाण केली. हा प्रकार २८ जानेवारीला सायंकाळी सातच्या सुमारास सिडको, एन-७ भागात दत्त मंदिराजवळ घडला. हरिभाऊ सांडू घुसळे (वय ७०, रा. मारुती मंदिराजवळ, जाधववाडी) यांच्या मुलीला राहुल खंडागळे (३५, रा. एन-७, सिडको) हा मारहाण करत असल्याचा फोन आला. त्यामुळे घुसळे यांनी खंडागळेच्या घरी धाव घेतली. त्यावेळी त्यांनी मुलीला मारहाण केल्याचा जाब विचारला. त्यावरुन खंडागळेने घुसळे, त्यांची पत्नी व मुलीला शिवीगाळ तसेच मारहाण केली. याचवेळी त्याने विटकरीने डोळ्याच्या बाजूला व छातीवर मारुन जखमी केले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशी दारुची अवैध विक्री

औरंंंगाबाद : देशी दारुची अवैध विक्री करणा-या समाजसेवकाला सिटीचौक पोलिसांनी पकडले. या समाजसेवकाकडून दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली आहे. रमेश कचरु चांदणे (वय ५१, रा. गल्ली क्र. १, शताब्दीनगर) हा २९ जानेवारीला रोज गार्डनसमोरुन दुचाकीवर देशी दारुच्या २६ बाटल्या घेऊन जात होता. त्याबाबत माहिती मिळाल्यावरुन सिटीचौक पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी दुचाकीसह दारुच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी पोलीस शिपाई माजीद पटेल यांच्या तक्रारीवरुन चांदणेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!