Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वार वॉचमन ठार बीड बायपासवरील दिशानगरी येथील घटना

Spread the love

औरंंगाबाद : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत ६० वर्षीय सायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी (दि.३१) दुपारी बीड बायपास रोडवरील दिशानगरी जवळ घडला असल्याची माहिती सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी कळविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत रामभाऊ अंभोरे (वय ६०, रा.बुलढाणा, ह.मु. दिशानगरी, बीड बायपास ) असे अपघातात ठार झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. वसंत अंभोरे हे वॉचमन म्हणून काम करीत होते. रविवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारासत ते वॅâनमध्ये पाणी आणण्यासाठी सायकलवर बीड बायपास रोडने जात होते. त्यावेळी दिशानगरीजवळ भरधाव वेगाने आलेल्या ट्रक क्रमांक (एमएच-१२-एमव्ही-२०९८) ने धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वसंत अंभोरे यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले.

या अपघातप्रकरणी सातारा पोलिसांनी ट्रकचालक मो.आरिफ खान अब्दुल हमीद खान (वय ३४, रा.मेवात, जि.पलवल, हरियाणा) याला ट्रकसह ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत या अपघातप्रकरणी ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!