Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वाहन चोरट्यांचा धुमाकुळ, चार दुचाकी लंपास

Spread the love

औरंंगाबाद : शहर परिसरात गेल्या काही महिन्यापासून वाहन चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून पुन्हा चार दुचाकी लंपास करीत पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. वाढत्या वाहन चोऱ्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून पोलिसांनी वाहन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.

दिपक माणिकराव भाकरे (वय ३८, रा.राजे संभाजी नगर, पिसादेवी रोड) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीएल-६५४८) चोरट्याने २३ जानेवारी रोजी सायंकाळी घराजवळून चोरून नेली. मोहम्मद जावेद नुर मोहम्मद बागवान (वय ३५, रा. सब्जीमंडी, खोकडपूरा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीजी-०१२८) चोरट्याने २५ जानेवारी रोजी सकाळी जाधववाडी परिसरातून चोरून नेली. विकास रामदास करपे (वय २३, रा.रामेश्वरनगर, हर्सूल) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईझेड-३५९९) चोरट्याने २४ जानेवारी रोजी चेलीपुरा येथील तोटी की मस्जीद जवळून चोरून नेली. इमरान खान उमर खान (वय २५, रा.गणेश कॉलनी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीआर-८१८०) चोरट्याने २४ जानेवारी रोजी दुपारी प्रोझोन मॉलच्या पार्विंâगमधुन चोरून नेली.

विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे सिडको – २, सिटीचौक – १ आणि एमआयडीसी सिडको – १ असे एकूण ४ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!