Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बीडबायपास रोडवर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; दोन तरुणांचा मृत्यू

Spread the love

औरंगाबाद : शहराकडे निघालेल्या दुचाकीस्वार तरुणांना भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात दुपारी साडे तीनच्या सुमारास बीडबायपास रोडवरील नाईकनगर गेटसमोर घडला. सचिन कल्याण राठोड (३२) आणि नितेश पुंडलिक पवार (२५) दोघेही रा. पोरगाव तांडा, ता. पैठण अशी मृतांची नावे आहेत.

पोरगाव तांडा येथील सचिन राठोड व नितेश पवार हे दुचाकीने औरंगाबादकडे निघाले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास बीडबायपास रोडवरील नाईकनगर गेटसमोर आल्यावर त्यांच्या दुचाकीला पाठमागून आलेल्या भरधाव ट्रक (एमएच-०४-जीआर-४९६०) चालकाने जोराची धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, घटनास्थळी अपघातांनंतर संतप्त नागरिकांनी ट्रक पटवण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी, अपघाताची माहिती मिळताच पुंडलिक नगर ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांना समजूत घालून ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!