Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVaccination : राज्यात 73% कोरोना लसीकरण

Spread the love

राज्यात 538 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 187 (73 %) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात सर्वाधिक लसीकरण धुळे जिल्ह्यात (111%) झाले असून त्या पाठोपाठ बीड, पालघर, नांदेड, सिंधुदूर्ग आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत 2 लाख 19 हजार 696 कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.

आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात दैनंदिन लसीकरण झालेले कर्मचारी, टक्के आणि आतापर्यंतची एकूण संख्या):

अकोला (421, 84%, 2277), अमरावती (918, 92 %, 5247), बुलढाणा (444, 44%, 4417), वाशीम (288, 58 %, 2205), यवतमाळ (478, 53%, 3226), औरंगाबाद (923, 51 %, 6250), हिंगोली (382, 76 %, 1940), जालना (868, 87%, 4380), परभणी (297, 64 %, 2249), कोल्हापूर (1267, 63 %, 7060), रत्नागिरी (659, 69%, 3205), सांगली (940, 55 %, 6236), सिंधुदूर्ग (419, 93 %, 2129), बीड (995, 111 %, 4856), लातूर (1191, 92 %, 5357), नांदेड (1020, 93 %, 3841), उस्मानाबाद (627, 78%, 2913), मुंबई (1588, 51 %, 9873), मुंबई उपनगर (2842, 62%, 16918), भंडारा (292, 58 %, 2602), चंद्रपूर (780, 71 %, 4200), गडचिरोली (632, 90 %, 3732), गोंदिया (542, 90%, 2773), नागपूर (2317, 72%, 10402), वर्धा (926, 84%, 6039), अहमदनगर (1386, 58%, 7919), धुळे (777, 111 %, 4250), जळगाव (794, 61 %, 4953), नंदुरबार (470, 67 %, 2787), नाशिक (2049, 76%, 10213), पुणे (3819, 78%, 18,949), सातारा (1426, 89%, 8174), सोलापूर (1332, 67 %, 8766), पालघर (1146, 96%, 4827 ), ठाणे (4319, 92%, 22188), रायगड (613, 77%, 2343)

राज्यात सहा ठिकाणी को-वॅक्सीन लस देण्यात येत आहे. त्यातील अमरावती जिल्ह्यात आज 94 जणांना, पुणे येथे 15, मुंबई 17, नागपूर 38, सोलापूर 15 आणि औरंगाबाद 53 असे 232 जणांना ही लस देण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!