Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यपालांच्या दौऱ्याची शेतकरी मोर्चाला पूर्वकल्पना दिली होती -राजभवनाचे स्पष्टीकरण

Spread the love

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे व दि. २५ जानेवारी रोजी ते गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्याने राज्यपाल त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे राजभवनातून अगोदरच स्पष्ट करण्यात आल्याचे स्पष्टीकरण राजभवनकडून देण्यात आले आहे.

संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनंजय शिंदे यांना दि. २२ जानेवारी रोजी दूरध्वनीद्वारे तसेच निमंत्रक प्रकाश रेड्डी यांना दि. २४ जानेवारी रोजी लेखी पत्राद्वारे राज्यपालांच्या अनुपलब्धतेबद्दल कळविण्यात आले होते. शिंदे यांनी व्हॉटसॲप संदेशाद्वारे निरोप मिळाल्याचे मान्य केले होते. तसेच प्रकाश रेड्डी यांना याबाबतचे लेखी पत्र दिनांक २४ जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे वृत्त चुकीचे आहे असे राजभवनातून स्पष्ट करण्यात येत आहे. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार शिष्टमंडळाकडून दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता  निवेदन स्वीकारतील असेदेखील धनंजय शिंदे यांना पूर्वीच कळविण्यात आले होते व  तसे स्वीकृत असल्याबद्दल त्यांनी संदेशाद्वारे कळविले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!