Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त

Spread the love

औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या अनुषंगाने शहरातील हॉटेल, लॉज, रेल्वे स्थानक, बसस्थानक, ऐतिहासिक पर्यटनस्थळांची पोलीस तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणी केली जात आहे. यासाठी तीन उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, अकरा निरीक्षक, २७ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, ३५० पुरूष कर्मचारी व ४७ महिला कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यंदा कोरोनाचे सावट असल्याने पोलीस आयुक्तालयात साध्या पध्दतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!