Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : पुणे पोलिसांची अखेर ” एल्गार परिषदे”ला परवानगी

Spread the love

अखेर पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी असून येत्या ३० जानेवारीला गणेश क्रीडा मंच येथे या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.  निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी मावळत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी ३१ डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. मात्र, परिषदेला पोलिसांनी  परवानगी नाकारण्यात आली होती.

नियोजित एल्गार परिषदेला परवानगी मिळावी यासाठी कोळसे पाटील यांनी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र, करोनाचे संकट पाहता एल्गार परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर जर एल्गार परिषदेला परवानगी नाकारण्यात आली, तर आम्ही आमची एल्गार परिषद रस्त्यावर भरवू, नाहीतर मग जेलभरो आंदोलन करू असा इशारा बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला होता. मात्र हि परिषद त्यावेळी होऊ  शकली नाही.  या पूर्वी ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद वादग्रस्त ठरली होती. या परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी, १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. पोलिसांनी या परिषदेचा संबंध कोरेगावच्या हिंसाचाराशी जोडला होता.

दरम्यान आता मात्र, तीन वर्षांनंतर पुन्हा एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे आता ही परिषद ३० जानेवारी या दिवशी गणेश कला क्रीडा मंच येथे होत आहे. करोना असल्यामुळे या परिषदेला २०० जणांनाच सहभाग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!