Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : अखेर जो बायडन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान , ट्रम्प म्हणाले “मी पुन्हा येईन…”

Spread the love

अमेरिकेत निर्माण झालेले प्रचंड राजकीय वादळ आणि हिंसाचारानंतर अखेर जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली असून, ते अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायूर्ती सोनिया सोटोमेयर यांनी त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ दिली. तर, भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे. वॉशिंग्टन डीसी येथे हा शपथविधी सोहळा थाटात पार पडला. या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश यांनी सपत्निक उपस्थिती होती. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पॉपस्टार लेडी गागा यांनी अमेरिकेचे राष्ट्रगीत गायले.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडताच, जो बायडन यांनी ट्विट करत,‘अमेरिकेसाठी एक नवा दिवस’ असल्याचं म्हटलं होतं. या अगोदर जो बायडन यांनी तीनवेळा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवलेली आहे. “हा ऐतिहासिक दिवस आहे, हा लोकशाहीचा दिवस आहे, हा अमेरिकेचा दिवस आहे. आज लोकशाहीच्या मूल्यांचा उत्सव आहे. आज लोकशाहीचा विजय झाला आहे. लोकशाहीचं संरक्षण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. एकजुटीने अमिरेकेच्या विकासासाठी काम करू. अमेरिकेत वर्णभेद संपवण्यासाठी लढा द्यायचा आहे. सगळ्यांच्या विकासासाठी व रक्षणासाठी मी आहे. तसेच, आपल्या सर्वांना करोनाविरोधात देखील लढाई लढायची आहे. ” असं जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात सांगितलं.

ट्रम्प म्हणाले मी पुन्हा येईन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील ट्विट करत जो बायडन यांचं अभिनंदन केलं आहे. “माझे मित्र जो बायडन तुमचं अभिनंदन…ही तुमची वेळ आहे,” असं ट्विट करत ओबामा यांनी सोबत एक फोटोदेखील ट्विट केला आहे. दरम्यान, या अगोदर व्हाइट हाऊस सोडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना वॉशिंग्टन विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपल्या अखेरच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी कुटुंब आणि मित्रांचे आभार मानले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण कोणत्या ना कोणत्या तरी स्वरुपात पुन्हा परत येणार असल्याचं सूचक विधानही केलं आहे. “आमच्या कार्यकाळात काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. तुम्ही सर्वांनी खूप मेहनतीने काम केलं आहे. माझ्यासाठी कार्यकाळ खूप खास होता. आम्ही माजी सैनिकांचा सन्मान केला. आम्ही अमेरिकेच्या लष्कराला पुन्हा एकदा उभं केलं आहे. अमेरिकेच्या इतिहासात करामध्ये सर्वाधिक सूट दिली,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

अमेरिकेला कोरोनातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणाऱ्या कमला हॅरीस यांनी या अगोदर त्यांनी बायडन यांच्यासमोर देशाला कोरोनासाथीमुळे झालेल्या आर्थिक व आरोग्य परिणामातून बाहेर काढण्याचे आव्हान असल्याचं म्हटलं होतं. तसेच, अमेरिकेत आतापर्यंत ३ लाख ९८ हजार लोक मरण पावले असून, लाखो लोक आर्थिक दुष्टचक्रात सापडले आहेत. आम्हाला बरेच काम करून अनेक आव्हाने पेलायची आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही काम करायला तयार आहोत. आम्हाला जास्तीत जास्त काम करावे लागेल व आमच्या काळातील मार्गक्रमण हे अवघड आहे, असे देखील हॅरीस म्हणालेल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!