Serum institute fire : कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका नाही… या कारणामुळे लागली आग

Spread the love

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागली होती. करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या संपूर्ण देशासह जगाचे लक्ष पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागले असतानाच ही आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर लागलेली ही आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली होती. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. जवळपास चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

मुख्यमंत्री यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे निर्देश दिले. कोविडशील्ड वॅक्सीनची इमारत आगीच्या ठिकाणापासून लांब आहे. त्यामुळे या इमारतीस व वॅक्सीनचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. तसेच पुणे आयुक्तांकडून या संदर्भातील माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

वेल्डिंगच्या स्पार्कमुळे लागली आग

ही आग “वेल्डिंगच्या स्पार्कमुळे लागली व ज्वलनशील पदार्थांमुळे अधिकच वाढली. घटनास्थळी असलेले ज्वलनशील पदार्थ ही आग भडकण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरले. या अग्नितांडावात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.” अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी बोलताना पत्रकारपरिषदेत दिली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील या वृत्तास दुजोरा दिला आहे.

यावेळी टोपे म्हणाले, “आताच मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या एमएसझेड या मांजरी येथील फॅक्टरीतील एसईझेडी-३ या इमारतीस आग लागल्याची होती अशी माहिती मिळाली. दरम्यान दुपारी दोन वाजता आग लागली होती. त्यानंतर घटनास्थळी महापालिकेचे पाच टँकर व अन्य तीन टँकर असे तात्काळ बोलावण्यात आले होते. आग आटोक्यात आलेली आहे. संपूर्ण आग विझवण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागला. आग विझवल्यानंतर आतमध्ये पाहणी केली असता पाच मृतदेह आढळून आले, असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडून मिळालेली आहे. तर, कोविडशील्ड वॅक्सीनची इमारत आगीच्या ठिकाणापासून लांब आहे. त्यामुळे या इमारतीस व वॅक्सीनचे कोणतेही नुकसान झालेलं नाही. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही.

“सर्व सरकारी संस्था आणि लोकांना मी हे निश्चितपणे सांगू शकतो की कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही. कोव्हिशिल्डची निर्मिती अनेक इमारतींमध्ये केली जाते. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अशी एखादी घटना घडलीच तर लस सुरक्षित रहावी म्हणून मी मुद्दाम अशाप्रकारची रचना करुन ठेवली आहे, ” अशी माहिती अदर पूनावाला यांनी ट्विटरवरुन दिली आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी पुणे पोलीस आणि अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत.

पाच जणांचा आगीत होरपळून मृत्यू

“सुरुवातीला चार लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आग १०० टक्के विझल्यानंतर आपली लोकं शेवटच्या मजल्यावर पोहोचली तेव्हा मजला खाक झाला होता आणि पाच जणांचे मृतदेह पडले होते. पाचही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला,” असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.