भरधाव बोलेरोने रिक्षासह दोन दुचाकींना उडवले वाळूज परिसरातील लांझी चौकात अपघात

Spread the love

औरंंगाबाद : भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो पीकअप जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर बोलेरो पीकअपने समोर जात असलेल्या रिक्षाला आणि दोन दुचाकींना उडवले. हा अपघात मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील लांझी चौकात घडला. या अपघातात रिक्षातील पाच जण जखमी झाले असून जखमींवर घाटी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर भगवान डांगे (वय ३८), सुवर्णा रामेश्वर डांगे (वय ३०), आदित्य रामेश्वर डांगे (वय ६), करण रामेश्वर डांगे (वय १३) सर्व रा. नायगाव-बकवालनगर, रामेश्वर डांगेचा साडू सोमेश दिनकर हेलपाडकर (वय ३०) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. रामेश्वर डांगे हे त्यांच्या साडू आणि कुटुंबियासह जेवण करण्यासाठी रिक्षा क्रमांक (एमएच-२०-बीटी-९१५६) ने हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेलमध्ये जेवण करून डांगे कुटुंबिय आपल्या रिक्षातून वाळूजमध्ये नायगाव-बकवालनगरकडे जात होते. लांझी चौकात त्यांची रिक्षा आल्यावर पाठीमागून आलेल्या बोलेरो पीकअप जीप क्रमांक (एमएच-२६-एडी-९८७६) ने डांगे यांच्या रिक्षास धडक दिली. त्यानंतर बोलेरो जीपने समोर जात असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली.
अपघातानंतर चौकात असलेल्या नागरीकांनी बोलेरो जीपचालकास बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल वंâकाळ, पोलिस अंमलदार शेख सलीम, एन.एम.मालोदे, पंकज पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेवून नागरिकांच्या ताब्यातून बोलेरो जीप चालकाची सुटका करून त्याला ताब्यात घेतले. या घटनेची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

वाहन चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच, आणखी पाच दुचाकी लंपास

औरंंगाबाद : गेल्या काही महिन्यापासून शहर परिसरात वाहन चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. वाढत्या वाहन चोऱ्यामुळे दुचाकी वाहनधारक त्रस्त झाले असून पोलिसांनी वाहन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकातून जोर धरत आहे. दरम्यान, चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून आणखी पाच दुचाकी लंपास करीत पोलिसांना खुले आव्हान दिले आहे.
संदीम नेमीनाथ जयकर (वय ३२, रा. कैलासनगर, जिन्सी परिसर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफएल-९८८४) चोरट्याने १८ जानेवारी रोजी गारखेडा परिसरातील सुतगिरणी चौकातून चोरून नेली. युसूफ अकबर विराणी (वय ६२, रा.अमण विला, फाजलपूरा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीए-९८४७) चोरट्याने १८ जानेवारी रोजजी फाजलपुरा येथील गोदावरी जमातखाना जवळून चोरून नेली. तनवीर फहीम एम.हे.वहीद शेख (वय ५५, रा.शहाबाजार बक्कलगुडा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीआर-५६८१) चोरट्याने १३ जानेवारीच्या रात्री घराजवळून चोरून नेली. शेख अकबर शेख हामीद (वय ४०, रा.इंदिरानगर, गारखेडा परिसर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईएस-०३५१) चोरट्याने १५ जानेवारी रोजी किराडपुरा येथून चोरून नेली. सिटीचौक पोलिस ठाणे परिसरात राहणााऱ्या तक्रारदार महिलेची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीएस-५५२०) चोरट्याने १८ जानेवारीच्या रात्री घराजवळून चोरून नेली.
शहराच्या विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणाऱऱ्या

चोरट्याविरूध्द अनुक्रमे जवाहरनगर-१, सिटीचौक-३, सातारा-१ आणि जिन्सी पोलिस ठाण्यात १ असे एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.