Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

खंडपीठातील स्टेनोचा मेल आय डी हॅक करुन पैशाची मागणी,स्टेनोचा विभक्त पत्नीवर संशय,पोलिसआयुक्तांच्या आदेशाने गुन्हा दाखल

Spread the love

औरंगाबाद- विभक्त झालेल्या पत्नीने मामेभाऊ आणि अज्ञात मित्रांच्या मदतीने मेल आयडी हॅक करुन ओळखीच्या आप्तेष्टांना पैशाची मागणी करंत असल्याचा संशय घेत खंडपीठात स्टेनो पदावर काम करणार्‍या अधिकार्‍यानेदिलेल्या तक्रारी वरुन पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्या आदेशावरुन गुन्हा दाखल झाला. सहा महिन्यांपासून सायबर पोलिस ठाण्याकडे प्रलंबित होता. तांत्रिक दृष्ट्या अतिशय किचकट असलेल्या गुन्ह्यांचाच यापुढे सायबर पोलिसांनी तपास करावा.तर किरकोळ तांत्रिक गुन्हा हा संबंधित पोलिस ठाण्याने दाखल करुन पूर्ण करावा.असे आदेश पोलिसआयुक्तांनी दिलेले आहेत.

प्रशांत वडगावे (३८) रा. एन३सिडको असे फिर्यादीचे नाव असून ते खंडपीठात स्टेनो म्हणून काम करतात. गेल्या काही वर्षापासुन ते पत्नीपासुन विभक्त राहतात.सहामहिन्यांपूर्वी फिर्यादी वडगावे यांचा मेल आयडी हॅक करुन त्यांच्या आप्तेष्टांना मेलवरुन पैशाची मागणी होत होती. त्यामुळे वडगावे यांनी विभक्त पत्नी दिपाली रमेश जवळे हल्ली मु.गवळीगल्ली आझाद चौक लातूर यांच्यासह अन्य लोकांच्या विरोधात ३आॅगस्ट २०१९ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक बागवडे यांच्याकडे वडगावे यांचा अर्ज तपासावर होता. पण पोलिसआयुक्तांच्या आदेशाने हा गुन्हा पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. पुढील तपास एपीआय घन्नशाम सोनवणे करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!